भाजीची चव होणार कमी ; कारण कोथिंबीर एका जुडीची किंमत…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ सप्टेंबर ।। महाराष्ट्रातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळेच भाज्यांच्या दरांमध्येही वाढ झाल्याचं मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या सुरुातीलाच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच भाज्यांचे दर कडाडल्याचं दिसत आहे. असं असतानाच काही दिवसांपूर्वीच कोथिंबीरीने (Kothimbir Rate In Nashik Today) 450 रुपये जुडीचा टप्पा गाठल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र अवघ्या काही दिवसांमध्ये हा विक्रमही कोथिंबीरीने मोडीत काढला असून आता किचनमधील या दैनंदिन वापराच्या गोष्टीची किंमत गगनाला भिडल्याचं दिसत आहे. कोथिंबीरीच्या एक जुडीच्या किंमतीत टू व्हिलरची टाकी फुल होईल इतकी दरवाढ सध्या बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.

100 जुड्यांना 48 हजार रुपये
नाशिकमध्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाची रीपरीप सुरू आहे. सततच्या पावसामुळे नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्याची आवक घटली असून ती अगदी 10 ते 15 टक्क्यांवर आलेली आहे. शुक्रवारी म्हणजेच 6 सप्टेंबरच्या सायंकाळी पार पडलेल्या लिलावात एका शेतकऱ्याच्या कोथिंबिरीला विक्रमी भाव मिळाला. या शेतकऱ्याच्या कोथिंबीरीला सर्वाधिक म्हणजेच 100 जुड्यांना 48 हजार रुपये इतका भाव मिळाला आहे. म्हणजे या शेतकऱ्याच्या शेतातील कोथिंबिरीची प्रत्येक जुडी जुडी तब्बल 480 रुपयाला व्यापाऱ्याने खरेदी केली. अन्य एका शेतकऱ्याला 390 रुपये प्रति जुडी ऐवढा भाव मिळाला आहे. यामुळे सगळ्याच भाज्यांना आणि जेवणाला चव देणारी कोथिंबीर ही जेवणाच्या ताटातूनच गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *