![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ सप्टेंबर ।। गणेशाच आगमन झाल्यामुळे देशात आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. तर शहरातील मंडळांमध्ये गणरायाचा भल्ल्या मोठा मूर्ती मानाने उभा आहेत. पुढील 10 दिवस आता गणेशोत्सवाची धूम असणार आहे. अशात पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणेकर गणेशोत्सवादरम्यान गणेश मंदिर असो किंवा मंडळाचे गणेश मूर्ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी तुमच्या कामाची आहे.
गणेशोत्सवानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आल्याची माहिती पुणे वाहतूक पोलिसांनी दिलीय. शहरातील अनेक मुख्य रस्ते उत्सवादरम्यान वाहुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहेत. गणेशोत्सवादरम्यान शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीसाठी नवी नियमावली जाहीर केलीय.
गणेशोत्सव काळात येत्या 10 दिवसांमध्ये शहरातील एकूण 16 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. शहरातील 12 रस्त्यांवर जड वाहनांना गणेशोत्सवा दरम्यान पूर्णपणे बंदी असणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील रस्ते संध्याकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने पीएमपीच्या 66 मार्गातही बदल करण्यात आले आहेत.
या रस्त्यांवर वाहतुकीसाठी बंदी
लक्ष्मी रोड, शिवजी रोड, बाजीराव रोड, टिळक रोड, सिंहगड रोड, सणस रोड, केळकर रोड
या रस्त्यांवर जड वाहनांना बंदी
शास्त्री रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड, बाजीराव रोड, शिवजी रोड, कर्वे रोड,FC कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, सिंहगड रोड, गणेश रोड.![]()
