महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ सप्टेंबर ।। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दगडूशेठ मंदीर ट्रस्टकडून यंदा हिमाचल प्रदेशमधील जटोली मंदिराची प्रतिकृती सकरण्यात आली आहे. दत्त संप्रदायाचे ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुपारी 12नंतर भक्तांना दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी खुलं करण्यात आलं आहे. दगडूशेठ गणपती मखरात विराजमान झाल्यानंतर पहिल्याच दिवशी भाविकांनी लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केलीय.