महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नवी दिल्ली, 22 जुलै : देशात कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाउनमुळे संसदेचं कामकाज पुढे ढकलण्यात आले होते. अखेर आज संसदेची दारं उघडण्यात येणार आहे. आज राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेणार आहे.
आज सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे हा कार्यक्रम राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये होणार आहे.
देशभरातील एकूण 62 खासदार निवडून आले आहे. त्यांचा शपथविधी सोहळा हा अधिवेशनात पार पडणार आहे. आज फक्त मोजक्याच नेत्यांना शपथ दिली जाणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया, काँग्रेसचे दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे.
ही आहे महाराष्ट्रातील शपथ घेणाऱ्या खासदारांची यादी
महाराष्ट्र
– शरद पवार
– उदयनराजे भोसले
– प्रियंका विक्रम चतुर्वेदी
– डॉ. भागवत किशनराव कराड
– राजीव सातव
– रामदास अठावले