महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० सप्टेंबर ।। महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरु केली आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य सराकरनं जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांना दोन्ही महिन्यांचे 3 हजार रुपये जमा केले आहेत. आता सप्टेंबर महिन्यात अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे राज्यातील 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम अदा करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून ही योजना राबवली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.
राज्य सरकारनं नुकताच नवा शासन निर्णय जारी करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार केवळ अंगणवाडी सेविकांना दिले आहेत.