गौरी आगमनाच्या दिवशी करा सोन्याची खरेदी ! जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० सप्टेंबर ।। सध्या सागळीकडे गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. या दरम्यान सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. गणेशोत्सवामध्ये सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीचे दर मात्र घसरले आहे. तुम्ही जर सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे सोने चांदीचे दर कसे आहेत, जाणून घ्या.

सोने चांदीचे दर
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६५,८९० रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७१,८८० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीची किंमत ८३५ रुपये आहे म्हणजेच चांदी ८३,४६० रुपये किलोनी विकली जात आहे.

सोमवारी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी ७१,८५० रुपये होता आणि चांदीचा दर ८३,४८० रुपये प्रति किलो होता. यावरून तुमच्या लक्षात येईल की आज सोने ३० रुपयांनी महागले असून चांदीच्या दरात २० रुपयांची घट झाली आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,७७१ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१११,७५० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१०१ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७५० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१०१ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७५० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१०१ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७५० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *