महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० सप्टेंबर ।। आज घरोघरी गौराईचे आगमन होत आहे. लाडकी गौराई आपल्या घरी धनसंपत्ती आणि सुख शांती घेऊन येते. गौराई एक आई, ताई, मावशी, काकी, सासू आणि सून महिलांच्या अशा सर्व रुपात दिसते. बाजारात सध्या गौरीचे विविध मुखवटे आले आहेत.
काही ठिकाणी संपूर्ण साजशृंगारात गौरी आहेत. काही व्यक्ती आपली गौराई घरच्याघरी सजवतात. त्यासाठी गौरीला साडी नेसवणे हा एक मोठा टास्कच असतो. त्यामुळेच आज आम्ही तुमच्यासाठी गौरीला घरच्याघरी साडी कशी नेसवायची याची माहिती सांगणार आहोत.
सर्वात आधी तिवई घा. यावर वरील शरीर आणि मुखवटा ठेवून घ्या. त्यानंतर कमरेचा भाग तयार करण्याठी तुम्ही जुने न्युज पेपर किंवा अन्य कोणत्याही कागदाचा वापर करू शकता. कागद एकवरएक ठेवून कमरेचा आकार तयार करून घ्या. कमरेचा आकार तयार झाल्यावर चिकटपट्टीच्या मदतीने तिवईवर तो लावून घ्या.
पुढे साडी नेसवताना आधी साडी अर्धी दुमडून घ्या. गौरीची उंची तुम्हाला किती हवी आहे त्यानुसार साडीची उंची आधी सेट करून घ्या. त्यानंतर साडीचा एक गोल फेरा तुवईवर फिरवून घ्या. पुढे मिऱ्या आणि साडीला सिंपल पदर करून घ्या. सेप्टी पिनेच्या सहाय्याने संपूर्ण साडी सेट करून घ्या. या सिंपल ट्रिकने तुम्ही लाडक्या गौरीला साडी नेसवू शकता.
साजशृंगार
गौरीला साडी नेसवून झाल्यावर साजशृंगा करण्याची तयारी करा. सध्या मोत्याच्या दागिन्यांचा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा गौरीसाठी मोत्यांचे दागिने खरेदी करू शकता.
गौरीसाठी दागिन्यांची यादी
गौराई म्हणजे एक सुवासिनी असते. त्यामुळे तिच्यासाठी दागिने खरेदी करताना पुढील गोष्टी आठवणीने घ्या.
कुंकू
हळद
मंगळसूत्र
हिरव्या बांगड्या
मोत्यांचा हार
कानातले
नाकात नथ
कमरपट्टा
जोडवी
पैजण