महाराष्ट्र 24 – ऑनलाईन: विशेष प्रतिनिधी: दि.10 सप्टेंबर- तळेगाव दाभाडे शहरातील टिजीएच ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटर येथे राज्यात प्रथमच कॅन्सर रुग्णांवरील टोमोथेरपी उपचार प्रणालीसाठी शासकीय योजनेअंतर्गत उपचार करण्यात येणार असून या सुविधेचे उद्घाटन आज झाले.
यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले.. “कॅन्सरवरील निदान आणि उपचार यासाठी आपल्या मावळ तालुक्यात अद्ययावत हॉस्पिटल उभे राहिले हे नक्कीच दिलासादायक आहे.11 नोव्हेंबर 2022 रोजी या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार यांनी या हॉस्पिटलमधील उपचारांचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत करु,असा शब्द दिला होता.व तो आज पुर्णही केला.आजपासुन कॅन्सर रुग्णांसाठीच्या टोमोथेरपीसाठी शासकीय योजनेअंतर्गत उपचार करण्यात येणार आहेत.व याचा रुग्णांना नक्कीच फायदा होईल.
कॅन्सरच्या रुग्णांवरील रेडिओथेरपीसाठी अत्याधुनिक टोमोथेरपी ही उपचार पद्धत अचूक ठरत आहे.या प्रणालीमुळे रुग्णांवर अधिक परिणामकारकरित्या उपचार करणे शक्य होत आहे.आणि या उपचाराचा शासकीय योजनेत समावेश झाल्याने सर्वसामान्य कॅन्सर रुग्णांना देखील नक्कीच दिलासा मिळेल.”
यावेळी आमदार सुनील शेळके यांच्या सोबत, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ, टीजीएच श्री.गणेशभाऊ खांडगे, ऑन्को-लाईफचे संस्थापक श्री.उदय देशमुख, सचिव डॉ.सत्यजित वाढोकर दादा, चेअरमन श्री.शैलेश शाह, संचालक डॉ.प्रताप राजेमहाडिक, डॉ.शाळिग्राम भंडारी, श्री.विनायकराव अभ्यंकर, श्री.सुखेंदु कुलकर्णी, श्री.दिलीपभाई शाह आदि.मान्यवर उपस्थित होते.