Chandrashekhar Bawankule: ‘सर्वसामान्यांवर जी कारवाई, तीच कारवाई माझ्या मुलावरही’; अपघात प्रकरणी बावनकुळे स्पष्टच बोलले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ सप्टेंबर ।। ‘नागपूर येथील अपघाताच्या घटनेतील कार ही माझ्या मुलाच्या नावावर आहे. गाडी चालवणारा, त्यामध्ये बसणारा, यांच्यावर जो काही गुन्हा दाखल होत असेल तो पोलिसांनी करावा. सर्वसामान्यांवर जी कारवाई होते, ती कारवाई माझ्या मुलावरही झाली पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अपघाताच्या तपासात पोलिसांवर दबाव आणला नसल्याचा दावा केला.


बावनकुळे यांनी मंगळवारी पुण्यातील गणपती मंडळांना भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी नागपूर येथील घटनेबाबत भाष्य केले. नागपूर येथील अपघाताच्या घटनेतील कार बावनकुळे यांच्या मुलाच्या नावावर असल्याने पोलिसांवर तपासादरम्यान दबाव असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर बावनकुळे म्हणाले, ‘माझ्यासोबत काल दिवसभर गृहमंत्री होते. मी त्यांना एका शब्दाने ही काही बोललो नाही. जे नियम सर्वसामान्यांसाठी आहेत, तेच नियम या अपघाताच्या तपासात लावले पाहिजेत. गाडीत बसणारा दोषी असेल तर त्यावरही कारवाई करा. या चौकशीबाबत मी अधिक काही बोललो तर पोलिसांवर दडपण आल्यासारखे होईल. पोलिसांना त्यांचे काम करू द्या. कोणताही गुन्हा असेल तर तो त्यांनी दाखल करावा.’

‘परमेश्वराच्या कृपेने या अपघातात कोणतीही मोठी हानी झाली नाही. कोणीही जखमी अथवा जीवितहानी नाही. माझ्या मुलाच्या नावावर असलेली कारचाही अपघात होऊन काहीही घडू शकले असते. मात्र, परमेश्वर कृपेने कुठलीही मोठी घटना घडली नाही. या घटनेची नियमानुसार चौकशी करून कारवाई करावी. ही गाडी माझ्या मुलाच्या नावावर आहे, हे मी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. ती गाडी चालवणारा, गाडी बसणाऱ्यावर जो गुन्हा दाखल होत असेल, तो करावा. पोलिसांना जी चौकशी करायची असेल ती करावी. कोणालाही सोडू नये,’ असे बावनकुळे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *