देशात डिसेंबरपर्यंत कोरोना लसीचे ३० कोटी डोस बनवणार ; सिरम इंस्टिट्युट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे – , 22 जुलै : कोरोना विषाणूविरोधात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये लस बनवण्यात आली आहे. या लसीची मानवी चाचणी घेतली जात आहे. शिवाय या चाचण्या यशस्वीदेखील होत आहेत. भारतातही या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या या लसीचे उत्पादन केले जात आहे. या लसी संदर्भात पुण्याच्या सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला यांच्याशी संवाद साधला असता. भारतात डिसेंबरपर्यंत या लसीचे ३० कोटी डोस बनवून तयार होतील असे त्यांनी म्हटले आहे.

भारतात या लसीचे उत्पादन पुण्यातील सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया येथे होत असून याचे सीईओ अदार पुनावाला यांनी सांगितले की, आम्ही मोठ्या प्रमाणात या लसीचे उत्पादन करत आहे. या आठवड्यात लस बनवण्याची परवानगी मिळवली जात आहे. तसेच डिसेंबरपर्यंत ऑक्सफर्ड वॅक्सिन Covishield चे ३० कोटी डोस बनवले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *