Gold-Silver Price Today : सोन्या-चांदी पुन्हा तेजीत , पाहा किती आहे १० ग्रॅम सोन्याची किंमत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ सप्टेंबर ।। सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. बुधवारी म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी सोनं ४७२ रुपयांनी महागलं, तर चांदी ७४७ रुपयांनी महागली. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२०२२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मंगळवारी सोन्याचा भाव ७१,५९० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीही ७४७ रुपयांनी वधारून ८२,९५४ रुपये प्रति किलो ग्रॅम झाली आहे. सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएनं जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेजचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे.

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर

आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ४३१ रुपयांनी वाढून ७१,७३४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मात्र, २२ कॅरेट सोन्यासाठी ६५,९७२ रुपये प्रति १० ग्रॅम मोजावे लागतील. आज २२ कॅरेट सोन्यात ३९६ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ३२४ रुपयांनी वाढला असून तो ५४,०१७ रुपये प्रति १० ग्रॅम दराने उघडला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव २५३ रुपयांनी वाढून ४२१३३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

जीएसटीसह सोन्या-चांदीचे आजचे दर

जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ७४,१८२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. यामध्ये २१६० रुपये जीएसटीचे जोडलेले आहेत. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७३,८८६ रुपये आहे. ३ टक्के जीएसटीनुसार यात २१५२ रुपयांची भर पडली आहे. २२ कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर आज ते जीएसटीसह ६७,९५१ रुपयांवर पोहोचलं. यात १९७९ रुपये जीएसटीचा समावेश आहे.

१६२० रुपयांचा जीएसटी जोडल्यानंतर १८ कॅरेट सोन्याचा भाव आता ५४,०१७ रुपये झालाय. त्यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सचा नफा यांचा समावेश नाही. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ८५,४४२ रुपयांवर पोहोचलाय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *