महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ सप्टेंबर ।। सध्या सगळीकडे गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. जिकडे तिकडे गणपतीची तयारी सुरू आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण गणेशोत्सवामध्ये रमलेला दिसत आहे. पुणे ज्या प्रमाणे गणेशोत्सवासाठी लोकप्रिय आहे तसे मुंबई सुद्धा गणेशोत्सवासाठी ओळखले जाते. मुंबईचा गणेशोत्सव बघण्यासाठी दुरवरून लोक येतात.
मुंबईत अनेक गणपती व गणपतीचे मंडळे आहेत, जे खूप लोकप्रिय आहे. लालबागचा राजा असो किंवा चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा असो किंवा जीएसबी गणपती, गिरगावचा गणपती असो किंवा तेजुकाया मेन्शन गणपती इत्यादी गणपती बघायला लोक खूप गर्दी करतात. सोशल मीडियावर मुंबईतील गणपतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात.
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये लालबागच्या राजाचे जुने फोटो दाखवले आहे. १९३४ पासून ते २०२४ पर्यंतचे संपूर्ण फोटो यामध्ये दाखवले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लालबागचा राजाच्या १९३४ पासून ते २०२४ पर्यंतच्या सर्व मूर्तींचा प्रवास खूपच अद्वितीय आहे. दरवर्षी या मूर्तींच्या रचना आणि आकार बदलत गेले.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला १९३४ पासून ते २०२४ पर्यंत लालबागच्या राजाचे प्रत्येक वर्षीचा लूक दिसेल. लालबागचा राजाचे दरवर्षीचे रूप कसे होते, हे तुम्हाला या व्हिडीओमधून दिसेल. हे खूप दुर्मिळ फोटो आहेत, जे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.