महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ सप्टेंबर ।। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागात भरती करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तरुणांना शिक्षणासोबतच कामाची संधी मिळणार आहे. सरकारी विभागात नोकरीचा अनुभव घेण्याची ही उत्तम संधी आहे. याअंतर्गत एसटी महामंडळात नोकरीची संधी आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, यवतमाळ येथे लिपिक, सहाय्यक, शिपाई, इलेक्ट्रिशियन पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.यवतमाळ एसटी महामंडळात ६८ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १० वी पास किंवा आयटीआय किंवा डिप्लोमा पास पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या साइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांना ६००० ते १०,००० रुपये पगार मिळणार आहे.
सध्या मुख्यमंत्री ग्रामदूतसाठीदेखील भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर आहे. या भरतीअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत भरती केली जाणार आहे. ५०,००० रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.