स्व.सार्थक वायकर याच्या अपघाती मृत्यू नंतर नवलाख उंबरे ग्रामस्थांचा तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनवर मोर्चा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ सप्टेंबर ।। तळेगाव दाभाडे एमआयडीसी हद्दीतील जाधववाडी इंदोरी रस्त्यावर अवजड वाहनाच्या धडकेत स्व.सार्थक वायकर या शाळकरी मुलाचे अपघाती मृत्यूची दुर्दैवी घटना घडली. या संदर्भात तातडीने उपाययोजना व्हावी यासाठी , नवलाख उंबरे ग्रामपंचायत तर्फे तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला विविध मागण्यांच्या निवेदन देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता.

या निवेदनाद्वारे , अपघाताला दोषी असणाऱ्या ड्रायव्हर आणि त्याच्या मालकावरती गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना कडक शिक्षा व्हावी , आंबी सरकल पासून ते मावळ दरबार हॉटेलपर्यत जे बेकायदेशीर वाहने रोडच्या मध्ये उभे करतात त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी , कंपन्यांमध्ये जे ट्रक लोडिंग लोडिंग साठी येतात त्यांची कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्या आवारामध्ये व्यवस्था करावी , जो मुख्य रस्ता मावळ दरबार ते आर के पेट्रोल पंपापर्यत आहे त्याची रुंदी वाढवण्याबाबत त्वरित कारवाई करावी , नवलाख उंबरे ग्रामपंचायत व आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यावरती बेकायदेशीर वाहने ज्या कंपन्या उभी करत आहे त्यांना ग्रामपंचायत मार्फत वारंवार पत्र्यवहार करून सुद्धा तरी कंपन्यांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तरी एमआयडीसी पोलीस स्टेशन नी त्याची दखल घ्यावी अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

याबाबत युद्धपातळीवर कार्यवाही व्हावी अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला दिला.

याप्रसंगी , भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे , जेष्ठ नेते निवृत्तीभाऊ शेटे , राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ,युवा नेते रवि भाऊ शेटे यांच्यासह नवलाख उंबरे गावातील व परिसरातील लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *