Smartphone Under 15000 : 108 मेगापिक्सल कॅमेरा अन् बरेच काही, हे ५ स्मार्टफोन पाहाच ; किंमत फक्त १५ हजार

Loading

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ सप्टेंबर ।। तुम्ही जर कमी पैशात चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग साइटचा वापर करू शकता. यामध्ये तुम्हाला 15,000 रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन उत्तम फिचर्ससोबत मिळेल. या स्मार्टफोन पैशांसोबत कॅमेरा क्वालिटी आणि इतर फिचर्सही जबरदस्त असणार आहे. 15,000 रुपर्यांच्या कमी किंमतीत तुम्हाला पोको, इनफिनिक्स, रियलमी , रेडमी आणि एअरटेल या कंपनींचा समावेश आहे. हे स्मार्टफोन तुम्हाला कंपनीच्या अधिकृत साइट व्यतिरिक्त फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर मिळेल.

Infinix Note 40X 5G
Infinix ब्रँडच्या Note 40X 5G च्या 8GB/256GB व्हेरियंटची किंमत 14,999 रुपये आहे. तुम्हाला 8 GB व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने रॅम 16 GB पर्यंत वाढवता येऊ शकतो. या फोनला 6.78 इंचचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. मीडियाटेक डायमेंशन 6300 प्रोसेसर, 108 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5000 mAh पॉवरफुल बॅटरी आणि 18 वॅट फास्ट चार्ज सपोर्ट या भन्नाट फिचर्ससोबत हा फोन येतो.

Realme C53
Realme C53 स्मार्टफोनच्या 6GB/128GB व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर, 18 वॉट फास्ट चार्ज सपोर्ट, 5000 mAh बॅटरी आणि 90 Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे.

itel S24
itel S24 स्मार्टफोनच्या 16GB/128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,490 रुपये आहे. फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर हा फोन मिळत आहे. 6.6 इंच एचडी प्लस डिस्प्ले, 5000 mAh बॅटरी आणि 108 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा या फोनला देण्यात आला आहे.

X6 Neo 5G
Poco X6 Neo 5G तुम्हाला 13,999 रुपयांना फ्लिपकार्टवर मिळू शकतो. ही 8GB/128GB वेरिएंटची किंमत आहे. या स्मार्टफोनचे फिचर्स असे की, यात 6.67 इंच एचडी प्लस डिस्प्ले, मीडियाटेक डायमेंशन 6080 प्रोसेसर, 5000 mAh बॅटरी, 108 मेगापिक्सेल रिअर आणि 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi 13 5G
Redmi 13 5G अवघ्या 14,795 रुपयांना तुम्हाला मिळणार आहे. यात तुम्हाला 8GB/128GB वेरिएंट मिळेल. 108 मेगापिक्सेल रियर कॅमेरा तसेत क्वालकॉम प्रोसेसर देण्यात आले आहे. हा फोन 6.79 इंच एचडी प्लस डिस्प्ले मध्ये आहे. या स्मार्टफोनला 5G सपोर्ट देखील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *