महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ सप्टेंबर ।। भारतीय संस्कृतीत सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. प्रत्येक सणाचे विशेष असे महत्व आहे. सणासुदीला खास पारंपारिक पोशाख घालण्याची हौस प्रत्येकाला असते. महिला व मुली या खास साजश्रृगांर देखील करतात. सणाच्यादिवशी खास महिलांना नटायला- सजायला आवडते. यामध्ये महिला अधिकच उठून दिसतात. मात्र केवळ सणापुरतीच हे दागिने न घालता नियमित घातल्याने आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
सणउत्सव असला की छान नटून- सजून जायला सर्वानाच आवडते. अशावेळेस महिला व मुली पारंपारिक लूकवर मॅचिंग ज्वेलरी परिधान करतात. मराठमोळ्या लूकवर मुली व महिला या नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्या आणि पायात पैंजण हे दागिने घालतात. नथ, बांगड्या आणि पैंजण घालण्याचे आरोग्याला काय फायदे आहेत हे जाणून घ्या.
नथ
नथ हा महिलांच्या सोळा श्रृगांरापैकी एक आहे. फार पूर्वीपासून महिला व मुली नाकात नथ घालतात. लग्नाआधी मुलींचे नाक टोचण्याची जुनी परंपरा आहे. परंतू आता अनेक मुली व स्त्रिया सणालाच नाकात नथ घालताना दिसतात. नाकात नथ घातल्याने तुम्हाला आरोग्याविषयी समस्या उद्भवत नाही. नाकात नथ घातल्याने मासिक पाळीच्या समस्या दूर होतात. शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते. श्वसनासंबंधित समस्या असतील तर नाकात नथ घालणे फायदेशीर ठरेल.
हिरव्या बांगड्या
हिरव्या बांगड्या घालणे मराठी संस्कृतीत अत्यंत शुभ मानले जाते. लग्न झाल्यानंतर महिला हिरव्या बांगड्या घालतात. हिरव्या बांगड्या घातल्याने सकारात्मक ऊर्जा शरीरात प्रवेश करते आणि नकारात्मकता दूर होते. हातात बांगड्या घातल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते. काचेच्या बांगड्यांमधून होणारी कंपने शरीरावर विशेष प्रभाव पाडतात.यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवता येते.
पैंजण
पैंजण घातल्याने पायाचे सौंदर्य वाढते. पैंजण हा केवळ दागिना नसून आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. पैंजणाच्या आवाजाने सकारात्मकता येते. चांदीचे पैंजण घातल्याने शरीरात ऊर्जा प्रेरित होते. पाय दुखणे, पायाला मुंग्या येणे या समस्या होत असतील तर पैंजण घातल्याने आरामदायी वाटते. पैंजणाच्या आवाजामुळे नकारात्मक गोष्टींचा प्रभाव कमी होतो. आणि देवी शक्तीचा प्रभाव वाढतो तसेच प्रसन्नता वाटते.