बँक खात्याचा हा नियम माहिती आहे का? नियम मोडल्यास येते थेट इन्कम टॅक्स विभागाची नोटीस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.१५ सप्टेंबर ।। आजघडीला बँकेत खाते नसणारी एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही. आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेत खाते असणे हे आज अपरिहार्य झाले आहे. मात्र हेच आर्थिक व्यवहार करण्यासाठी काही नियम आहेत. तुम्ही एका दिवसासाठी किती रुपयांचा व्यवहार करू शकता? बँकेत तुम्हाला किती रुपये जमा करता येतील? याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे काही नियम आहेत. या नियमांचे पालन न झाल्यास तुम्हाला थेट प्राप्तिकर विभागाची नोटीस येऊ शकते. याच पार्श्वभूमीवर बँक खात्याच्या व्यवहारासंदर्भात नेमके नियम काय आहेत? ते जाणून घेऊ या…

बचत खात्यासाठी बँकेचे काही नियम
बँक खात्यात मिनिमम बॅलेन्सचा जसा नियम आहे, अगदी तसाच नियम हा कॅश डिपॉझिटचा आहे. व्यापारी, उद्योजक यांचे बँकेत नियमत मोठे व्यवहार होत असतात. त्यामुळे अशा व्यवहारांसाठी करट अकाउंट असते. ततर सर्वसामान्य लोकांसाठी सेव्हिंग प्रकारातले बँक खाते असते. त्यामुळे बचत प्रकारातील बँक खात्यासाठी व्यवहाराचे अनेक नियम आहेत. तुम्ही एका दिवसात किती रुपये जमा करू शकता, तसेच एका वर्षात जास्तीत जास्त किती रुपये जमा करता येतील, यासाठी आरबीआयने नियम ठरवून दिलेला आहे.

…तर पॅन कार्डची माहिती द्यावी लागेल
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार पॅन कार्डची माहिती बँकेकडे न देता तुम्ही तुमच्या सेव्हिंग बँक खात्यात 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम भरू शकता. मात्र 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम तुम्हाला बँक खात्यात जमा करायची असेल तर तुम्हाला बँकेकडे तुमच्या पॅन कार्डची माहिती द्यावी लागते.

…तर प्राप्तिकर विभागाची नोटीस येणार
बचत खात्यासाठी एका दिवसात, एका ट्रान्झिशनमध्ये किंवा एका व्यक्तीकडून जास्तीत जास्त 2 लाख रुपयांची रोकड जमा करता येते. तर एका आर्थिक वर्षात बचत खात्यात जास्तीत जास्त 10 लाख रुपयांची रोकड जमा करता येते. ही रक्कम वाढल्यास तुम्हाला प्राप्तिकर विभागाची नोटीस येऊ शकते.

प्राप्तिकर विभाग काय करावाई करू शकतो?
बचत खात्याच्या ठेवींवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही बंधनं घातेलली आहेत. प्रत्येक आर्थिक वर्षासाठी ठेवीची ही मर्यादा 10 लाख रुपये आहे. 10 लाख रुपयांपेक्षा अधिक रोकड तुम्ही बचत खात्यात जमा केल्यास तुम्हाला प्राप्तिकर विभागाकडून नोटीस येऊ शकते. प्राप्तिकर खात्याकडून बँकेच्या व्यवहारांची तपासणी केली जाते.

60 टक्के लागणार कर
तुम्ही तुमच्या बँकेच्या व्यवहारासंदर्भात योग्य स्पष्टीकरण देऊ न शकल्यास, तुमच्या पैशांचा स्त्रोत न दाखवू शकल्यास तुमच्यावर प्राप्तिकर विभागाच्या कलम 68 अंतर्गत कारवाई होऊ शकते. जमा केलेल्या रकमेवर तुमच्याकडून 60 टक्के कर, 25 टक्के सरचार्ज आणि 4 टक्के सेस आकारला जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *