Gratuity मोजताना कोणता फॉर्म्युला वापरला जातो? 5 वर्षांनंतर तुम्हाला किती पैसे मिळणार, पाहा…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ सप्टेंबर ।। आजच्या काळात प्रत्येक नोकरदार व्यक्ती कमाईतून बचत करण्याचा प्रयत्न करतो. नोकरी करताना पैसे कसे वाचवायचे याचीच त्याला चिंता सतावते. निवृत्तीपूर्वी जेव्हा एखादी व्यक्ती बचतीत भर घालते तेव्हा त्यामध्ये ग्रॅच्युइटीचाही समावेश होतो. एखाद्या संस्थेत पाच वर्षे सतत काम केल्यावर कर्मचारी ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र ठरतो. कंपनीत सतत पाच वर्षे सेवा देण्यासाठी नियोक्ता ग्रॅच्युइटीच्या रूपात कर्मचाऱ्यांचा सन्मान करतो.

म्हणजे तुम्ही एकाच कंपनीत सलग पाच वर्षे काम केले तर तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठराल. पण तुम्हाला ग्रॅच्युइटी किती मिळणार आणि ती कशी मोजली जाते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. खाजगी क्षेत्रातील प्रत्येक कर्मचारी पाच वर्षे पूर्ण झाल्यावर किती ग्रॅच्युइटी मिळेल याचा विचार करत असतो. केंद्र सरकारने कामगार कायद्यात काही बदल करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती मात्र, अद्याप याबाबत कोणतेही अपडेट आलेले नाही. पाच वर्षांची मर्यादा कमी करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून सातत्याने होत आहे मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. अशा स्थितीत, ग्रॅच्युइटीबद्दल चर्चा होते तेव्हा तुम्हाला प्रश्न पडला असेल की ग्रॅच्युइटी म्हणजे काय आणि नियोक्ता कोणत्या आधारावर मोजतो.

ग्रॅच्युइटीची गणना कशी केली जाते
ग्रॅच्युइटीची गणना फार कठीण नाही. ग्रॅच्युइटी ही पाच वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर नियोक्ता कंपनीने दिलेली रक्कम असते. अशा परिस्थितीत पाच वर्षांच्या सेवेनंतर प्रत्येक वर्षासाठी शेवटच्या महिन्याचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता जोडून १५ ने गुणाकार केला जातो. यानंतर, तुमच्या ग्रॅच्युइटीची रक्कम एकूण सेवेची वर्षे आणि त्यानंतर मिळालेली रक्कम २६ ने भागून काढली जाते.

ग्रॅच्युइटीचा फॉर्म्युला समजून घ्या…
तुम्हाला सोप्या शब्दात ग्रॅच्युइटी मोजण्याचे गणित समजून घ्यायचे असेल तर, तुम्ही ग्रॅच्युइटीची गणना [(गेल्या महिन्याचे मूळ वेतन + महागाई भत्ता) x १५ x सेवेतील वर्षे] / २६ द्वारे करू शकता. पेमेंट आणि ग्रॅच्युइटी कायदा भारतातील कारखाने, खाणी, रेल्वे आणि बंदरांमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना लागू होतो. याशिवाय दहापेक्षा जास्त कर्मचारी मग दुकान असो किंवा कंपनीतील प्रत्येकाला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो.

तुम्हाला किती ग्रॅच्युइटी मिळणार
उदाहरणार्थ समजा तुम्ही कंपनीत पाच वर्ष दोन महिने काम केले तर तुमची पाच वर्ष सेवाच ग्राह्य धरली जाईल. आता समजा या कालावधीतील तुमचे शेवटचे मूळ वेतन रुपये २६ हजार असून तुम्हाला त्यावर १३ हजार रुपये महागाई भत्ता मिळतो. तर आता अशा स्थितीत, ग्रॅच्युइटीची गणना करण्यासाठी प्रथम २६ हजार आणि १३ हजारांचे कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला ३९ हजार रुपये मिळतील. आता या रकमेचा १५ ने गुणाकार केल्यावर एकूण रक्कम ५.८५ लाख रुपये होईल त्यांनतर, याला नोकरीच्या एकूण वर्ष म्हणजे पाचने गुणाकार केल्यास एकूण कॅल्क्युलेशन २,९२५,००० रुपये होईल ज्याला शेवटी २६ ने भागाल्यावर एकूण रक्कम ११२,५०० रुपये होईल जी तुमची ग्रॅच्युइटी होईल जी तुम्हाला कंपनीतून राजीनामा दिल्यावर मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *