महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ सप्टेंबर ।। गेल्या काही महिन्यापासून सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. गणेशोत्सवा दरम्यान मात्र सोने चांदीचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले. १३ सप्टेंबर २०२४, शुक्रवारी सोने चांदीच्या दरात वाढ दिसून आली. १० ग्रॅम सोने ७३,८१० रूपयांना आणि चांदी ८९,१६० रुपये किलो होती. सोने चांदीच्या वाढलेल्या दराची सध्या सगळीकडे चांगलीच चर्चा होत आहे.
सोने चांदीचे दर
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६७,६५९ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७३,८१० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीची किंमत ८९२ रुपये आहे म्हणजेच चांदी ८९,१६० रुपये किलोनी विकली जात आहे. आज जरी सोने चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही तरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोने चांदीच्या दर चांगलेच वाढले आहेत.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६७,५४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७३,६८० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,५४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,६८० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,५४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,६८० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,५४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,६८० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)