New Rules: नव्या सिमकार्डपासून, Number Port करण्यापर्यंत केंद्रानं बदलले महत्त्वाचे नियम; आताच पाहा Update

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ सप्टेंबर ।। देशात दर नव्या दिवशी नवे नियम आणि नवे बदल पाहायला मिळत असून, झपाट्यानं बदलणाऱ्या काळात या बदलांची संख्याही सातत्यानं वाढताना दिसत आहे. आधुनिकीकरणाच्या कारणास्तव अनेक क्रांतिकारी बदलांचा साक्षीदार यापूर्वीही देश झाला असून आता यामध्ये आणखी एका बदलाची भर पडणार आहे. या बदलाअंतर्गत नव्यानं सिमकार्ड खरेदी करणं अधिक सोयीचं झालं आहे. नियमानुसार ही संपूर्ण प्रक्रिया आता पेपरलेस पद्धतीनं होणार असून, यांमुळं फसवेगिरीचा प्रकारही घडणार नसल्याची हमी दूरसंचार विभाग (DoT) च्या वतीनं देण्यात आली आहे.

आता पायपीट नाहीच…
नव्या नियमांनुसार सिमकार्ड खरेदीसाठी आता ग्राहकांना टेलिकॉम ऑपरेटरकडे जाण्याची किंवा त्यांच्या कार्यालयात फेऱ्या मारणाची आवश्यकता नाही. कारण, इथून पुढं ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. थोडक्यात सिमकार्ड घ्यायचं झाल्यास किंवा ते पोर्ट करत टेलिकॉम ऑपरेटर बदलायचं झाल्यास आता कोणत्याही अडचणींशिवाय कागदपत्रांची ऑनलाईन पद्धतीनंच पडताळणी केली जाणार आहे.

नव्या बदलांची माहिती केंद्रानं X च्या माध्यमातून गिली असून, या नियमांच्या माध्यमातून फसवेगिरी आणि तत्सम प्रकरणांवर आळा घालणं शक्य होणार असून, देशाला पूर्णपणे डिजिटल स्वरुपात जगापुढं सादर करण्यासाठी हे पाऊल उचललं जाणार आहे. सरकारनं e-KYC आणि KYC सुरू केली असून, यानुसार आता सर्व कामं ऑनलाईन पद्धतीनं होणार आहेत. या प्रक्रियेअंतर्गत सर्व कागदपत्र आता सुरक्षितपणे पडताळणी प्रक्रियेतून पुढे जाणार असून, बनावट सिमकार्डांच्या प्रकरणांवरही सहज आळा घालता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *