![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ सप्टेंबर ।। पुण्यात आता गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरु झाली आहे. सोहळ्यासाठी १७ सप्टेंबर रोजी गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. पुणेच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पुण्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी येत असतात. गर्दी वाढणार असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शिवाय, विसर्जन मिरवणूक पाहायला येणाऱ्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुण्यात १३ ठिकाणी मोटारी आणि दुचाकी लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन सोहळ्यानिमित्त १३ ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था पोलिसांनी उपलब्ध करून दिल्याची माहिती आहे.
वाहने लावण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे
शिवाजी आखाडा वाहनतळ, मंगळवार पेठ
एसएसपीएमएस मैदान,
स. प. महाविद्यालय, टिळक रस्ता
पेशवे उद्यान, सारसबाग
पाटील प्लाझा, मित्रमंडळ
दांडेकर पूल ते गणेश मळा
नीलायम चित्रपटगृह
संजीवनी वैद्यकीय महाविद्यालय मैदान
कर्वे रस्ता
फर्ग्युसन महाविद्यालय मैदान
जैन हाॅस्टेल मैदान
बीएमसीसी रस्ता
मराठवाडा महाविद्यालय
नदीपात्र ते भिडे पूल
पुणे शहरातील प्रमुख रस्ते उद्या वाहतुकीसाठी पूर्णपणे राहणार बंद
विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने लक्ष्मी रोड, टिळक रोड सह शहरातील प्रमुख रस्ते बंद राहणार आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत रस्ते बंद राहणार आहेत. शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते तसेच उपरस्ते वाहतुकीस बंद असतील. पुण्यात सकाळी ९ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. आपत्कालिन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यासाठी त्वरीत मार्ग उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी बंद असणारे प्रमुख रस्ते
– लक्ष्मी रोड
– टिळक रोड
– कुमठेकर रोड
– केळकर रोड
– शिवाजी रोड
– जंगली महाराज रोड
– एफ सी रोड
– कर्वे रोड
– प्रभात रोड
विसर्जन मिरवणुकीची माहिती आता एका ॲप द्वारे
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची माहिती आता एका ॲप द्वारे मिळणार आहे. गणेश विसर्जनादिवशी ‘माय सेफ पुणे’ अॅपद्वारे बंदोबस्त आणि मंडळांची माहिती प्राप्त होणार आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी जागा, पोलिस मदत केंद्रे, पादचारी मार्ग यांची माहिती या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. विसर्जन मिरवणूक मार्ग, बंद रस्ते आणि मंडळांच्या मिरवणुकीबाबत सद्य:स्थितीची माहिती दिली जाणार आहे.![]()
