5 लाखांच्या आत घरी आणा ‘ही’ CNG कार ; जबरदस्त मायलेजची TATA ची हमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ सप्टेंबर ।। कार खरेदी करण्यासाठी सर्व गोष्टींचा विचार करत सोबतच आपल्या कुटुंबाच्या Comfert चाही विचार करत असणाऱ्यांसाठी एक कमाल पर्याय खुद्द टाटा कंपनीनंच आणला आहे. आता TATA चीच हमी मिळतेय तर आणखी काय हवं? असंच अनेकांचं मत करणारी ही कार म्हणजे टाटा टिएगो. सणासुदीचे दिवस पाहता टाटाकडून अनेक कारच्या मॉडेलवर घसघशीत सवलत देण्यात आली आहे.

जबरदस्त हॅचबॅक फिचर आणि सोबत सुरक्षिततेची हमी देणारी ही कार सीएनजी मॉड्युलमध्ये असल्या कारणानं इथं सहज इंधन बचतही होत आहे. TATA Tiago चर्चेत येण्याचं आणखी एक कारण म्हणजे कंपनकडून कारच्या दरात करण्यात आलेली घट.

सध्याच्या घडीला ही देशातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक असून, ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 4 Star Rating देण्यात आलं आहे.
1.2 पेट्रोल इंजिनसह येणारी ही कार 86 PS पॉवर आणि 113 Nm जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडण्यात आलं आहे.
टाटा टिएगोचं पेट्रोल व्हेरिएंट 19किमी/ लीटर आणि सीएनजी मॉड्युल जवळपास 26 किमी/ किग्रॅ इतकं मायलेज देते. 7 इंच टचस्क्रीन इंन्फोटेन्मेंट सिस्टीम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 8 स्पीकर साऊंड सिस्टीम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि कूल्ड ग्लवबॉक्स असे फिचर या कारमध्ये देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *