भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांचे शक्तिप्रदर्शन

Spread the love

Loading

 गणेशोत्सव दर्शनपर भेटींना कार्यकर्त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

महाराष्ट्र 24 – लोणावळा : ता.१६ (प्रतिनिधी) : भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी लोणावळा शहर आणि परिसरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन , गणरायाची आरती केली. गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.

सध्या तालुक्यात गाजत असलेले “आप्पा , यंदा माघार नाही ..!! ” वाजवत , कार्यकर्त्यांनी रविंद्र आप्पांचे उस्फुर्त स्वागत केले. रविंद्र आप्पा , तुम आगे बढो , हम तुम्हारे साथ है , या घोषणांनी मंडळांचा परिसर निनादून गेला होता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविंद्र आप्पा भेगडे यांनी गणेश मंडळ दर्शन भेटीच्या निमित्ताने केलेल्या शक्ती प्रदर्शनाने रविंद्र भेगडे आता थांबणार नसल्याची चांगलीच चर्चा लोणावळा शहरात रंगल्याचे पहावयास मिळाले.

या दर्शनपर भेटीमध्ये त्यांनी लोणावळा शहरातील ,पहिला मानाचा गणपती श्री रायवूड गणेश मंडळ, तरुण मराठा मंडळ गावठाण लोणावळा,ओंकार तरुण मंडळ तुंगार्ली, शेतकरी भजनी मंडळ वळवण, लोणावळ्याचा राजा जय महाराष्ट्र गजानन मित्र मंडळ, श्री राणा प्रताप नेताजी मित्र मंडळ, श्री तुफान मित्र मंडळ लोणावळा गावठाण, श्री संत रोहिदास तरुण मंडळ, महाराष्ट्र मातंग समाज मंडळ, श्री साईनाथ मित्र मंडळ, श्रीमंत नेहरू मित्र मंडळ, अखिल भाजी व फळ मार्केट गणेशोत्सव मंडळ, श्री नवयुग महाराष्ट्र मित्र मंडळ, नटराज मित्र मंडळ लोणावळा, इंद्रायणी नगर गणेशोत्सव मंडळ, श्री शिवाजी मित्र मंडळ आदी गणेश मंडळांना भेटी दिल्या.

यावेळी त्यांच्या समवेत लोणावळा नगर परिषदेच्या मा.नगराध्यक्षा श्रीमती सुरेखाताई जाधव, मा.उपनगराध्यक्ष श्री.श्रीधरजी पुजारी साहेब, मा.सभापती गुलाब काका म्हाळसकर, लोणावळा शहर भाजपा अध्यक्ष श्री.अरुण भाऊ लाड, मा.नगरसेवक श्री.अमोल भाऊ शेटे, वडगाव शहर भाजपा अध्यक्ष श्री.संभाजी भाऊ म्हाळसकर,भाजपा मावळ तालुका सरचिटणीस श्री.सचिन भाऊ येवले, भाजपा मावळ तालुका उपाध्यक्ष श्री.अमोल भाऊ धिडे, शहर भाजपा सरचिटणीस शुभम भाऊ मानकामे, भाजपा वाकसई गण अध्यक्ष श्री.अमोल भाऊ भेगडे, भाजपा कुसगाव गण अध्यक्ष श्री.शेखर भाऊ दळवी, भाजपा मावळ तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष श्री.अभिजीत भाऊ नाटक, भाजपा मावळ तालुका युवा वॉरियर्स प्रमुख प्रनेश भाऊ नेवाळे, लोणावळा शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रथमेश भाऊ पालेकर , सागर येवले,रुपेश येवले यांच्यासह भारतीय जनता पार्टी लोणावळा शहरातील व रविंद्र आप्पा भेगडे युवा मंचाचे शेकडो सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *