महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ सप्टेंबर ।। Konkan Railway Recruitment 2024: अनेकांचे रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. कोकण रेल्वेमध्ये विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नोकरीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सदर भरतीच्या माध्यमातून नेमकी कोणती आणि किती पदे भरली जाणार आहेत, अर्ज कुणी करावा, त्यासाठी पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता, निवड पद्धती आणि अर्जाची अंतिम तारीख काय आहे याबद्दल याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या बातमीमध्ये मिळेल.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड १९० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील पात्र उमेदवार यासाठी ६ ऑक्टोबरपर्यंत konkanrailway.com वर अर्ज करू शकतात.
आणखी वाचा
रिक्त जागा
विद्युत विभाग
वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer): ५ रिक्त जागा
तंत्रज्ञ (Technician-I II): १५ जागा
असिस्टंट लोको पायलट: १५ जागा
नागरी विभाग
वरिष्ठ विभाग अभियंता: ५ रिक्त जागा
ट्रॅक मेंटेनर: ३५ रिक्त जागा
यांत्रिक विभाग
तंत्रज्ञ (Technician-I II) २० रिक्त जागा
ऑपरेटिंग विभाग
स्टेशन मास्टर: १० रिक्त जागा
गुड्स ट्रेन मॅनेजर: ५ जागा
पॉइंट्स मॅन: ६० रिक्त जागा
सिग्नल आणि दूरसंचार विभाग
ESTM-III: १५ जागा
व्यावसायिक विभाग
व्यावसायिक पर्यवेक्षक: ५ रिक्त जागा
कोकण रेल्वे भरती: कोण अर्ज करू शकते ते जाणून घ्या
जमीन गमावणारे उमेदवार: ज्या उमेदवारांची जमीन KRCL प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे ते या पदांसाठी अर्ज करू शकतात. जमीन गमावणाऱ्यांची जोडीदार (पत्नी/पती), मुलगा, मुलगी, नातू आणि नातवंडे देखील पात्र आहेत. या उमेदवारांना निवड प्रक्रियेत प्रथम प्राधान्य मिळेल.
जमीन गमावलेल्या उमेदवारांव्यतिरिक्त: कोकण रेल्वे मार्गावरील एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नोंदणीकृत वैध एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्ड असलेल्या उमेदवारांना भरती मोहिमेत दुसरे प्राधान्य मिळेल. महाराष्ट्र, गोवा किंवा कर्नाटकमध्ये राहणाऱ्या उमेदवारांना या पदांसाठी तिसरे प्राधान्य मिळेल. KRCL कर्मचारी: संस्थेचे कर्मचारी ज्यांनी संस्थेत किमान तीन वर्षे नियमित सेवा पूर्ण केली आहे ते देखील पात्र आहेत.
वयोमर्यादा
वरील पात्रता अटी पूर्ण करणारे आणि १ ऑगस्ट २०२४ रोजी १८ ते ३६ वर्षांच्या दरम्यान असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. कोविड-19 महामारीमुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना दिलासा देण्यासाठी उच्च वयोमर्यादा ३३ वरून ३६ करण्यात आली आहे.राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत आणखी सवलत दिली जाईल.
पगार किती मिळेल?
१. सीनियर सेक्शन इंडजीनियर ४४,९०० रुपये प्रति महिना (पे लेव्हल 7)
२. स्टेशन मास्टर : ३५,४०० रुप्ये प्रति महिना (पे लेव्हल
३. व्यावसायिक पर्यवेक्षकासाठी: ३५,४०० रुपये प्रति महिना (पे लेव्हल 6)
४. गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी: २९,२०० रुपये प्रति महिना (पे लेव्हल 5)
५. टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल): १९,९०० रुपये प्रति महिना (पे लेव्हल 2)
६. असिस्टंट लोको पायलटसाठी: ९,९०० रुपये प्रति महिना (पे लेव्हल 2)
७. पॉइंट्स मॅन आणि ट्रॅक मेंटेनरसाठी: १८,००० रुपये प्रति महिना (पे लेव्हल (1)