रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24- ऑनलाईन- ता.१७ (प्रतिनिधी) : भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने , संपूर्ण मावळ विधानसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढत , भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

जिथे जिथे शक्य आहे , तिथे-तिथे आणि जिथे वेळेअभावी पोहोचणे शक्य नाही त्याठिकाणी रविंद्र आप्पा भेगडे युवा मंचचे कार्यकर्ते आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.सौ.उज्ज्वला भेगडे यांनी मोर्चा सांभाळत , गणेशभक्त आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

प्रत्येक ठिकाणी रविंद्र भेगडे यांचे कार्यकर्ते “आप्पा , यंदा माघार नाही.!” हे सध्या मावळ मध्ये गाजत असलेले प्रचारगीत वाजवत ,शेकडोंच्या संख्येने गणेश आरतीच्या वेळी कार्यकर्ते उपस्थित राहत , मावळ मध्ये यंदा भाजपचीच लाट असल्याचे जाणवून देत होते. ‘रविंद्र आप्पा तुम आगे बढो ‘ च्या घोषणांनी गणेश मंडळे दुमदुमून गेल्याचे याप्रसंगी , पाहायला मिळाले.

माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना , भाजप मावळ तालुका जेष्ठ नेते बाळासाहेब गाडे म्हणाले , “यंदा मावळ विधानसभेसाठी रविंद्र आप्पा भेगडे यांना संधी द्यावी अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. गेल्या ५ वर्षांपासून , रविंद्र आप्पा भेगडे यांनी मावळ मध्ये भाजपचा पुन्हा झंझावात उभा केला आहे. त्यामुळे यंदा काहीही झाले तरी मावळ मध्ये भाजपचा झेंडा फडकवायचाच असा निर्धार आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा आहे. ” देहू शहर भाजप अध्यक्ष मच्छिंद्र परंडवार म्हणाले , “जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून देहू नगरीचा लौकिक आहे. वारकरी संप्रदायातील एक प्रमुख केंद्र असलेल्या देहूचा विकास गेल्या ५ वर्षांपासून जैसे-थे स्थितीत आहे. देहूचे बकालीकरण वाढत असताना , अनेक नागरी समस्यांमुळे देहूकर त्रस्त आहेत. अशा वेळेस रवी आप्पा यांच्यासारखा एक स्वच्छ प्रतिमेचा चेहराच आता मावळ विधानसभेसाठी येथील मतदार निवडून देतील असा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना विश्वास वाटतो.”

गेल्या अनेक निवडणुकांमध्ये रवी आप्पा यांनी पक्ष आदेश शिरसावंद्य मानून थांबण्याचा निर्णय घेतला होता आता मात्र रवी आप्पा यांनी माघार घेऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक निष्ठावान कार्यकर्ता आक्रमक झाल्याचे गणेशोत्सवांच्या भेटी दरम्यान प्रकर्षाने जाणवत आहे!

याप्रसंगी , देहुगाव शहर भाजपा अध्यक्ष मच्छिंद्र भाऊ परंडवाल, पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संतोष भाऊ हगवणे,जेष्ठ नेते बाळासाहेब गाडे,मावळ भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिजीत भाऊ नाटक,सचिन भाऊ काळोखे, प्रकाश उर्फ रायबा मोरे, गणेश भाऊ खंडागळे,भाजपा मावळ तालुका युवा वॉरियर्स अध्यक्ष प्रनेश भाऊ नेवाळे,प्रद्युम्न भाऊ टिळेकर, नरेंद्र कोळी , करण भाऊ चव्हाण यांच्यासह देहूगाव शहरातील भारतीय जनता पार्टी व रविंद्र आप्पा भेगडे युवा मंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *