Vodafone युजर्स आहात का? ही बातमी तुमच्यासाठी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० सप्टेंबर ।। Vodafoneने युजर्सला मोठा झटका दिला आहे. कंपनीने आपल्या दोन मोठ्या प्लान्सची व्हॅलिडिटी कमी केली आहे. कंपनीने ज्या प्लान्सची व्हॅलिडिट कमी केली आहे यात ६६६ आणि ४७९ रूपयांचे प्लान्स सामील आहेत. व्होडाफोनकडून जुलै २०२४मध्ये प्लान्सची व्हॅलिडिटी कमी केली होती. कंपनीने आता पुन्हा असा निर्णय घेतला आहे. प्लान्सची व्हॅलिडिटी कमी केल्याने युजर्सला मोठा झटका बसू शकतो.

Vodafone Ideaच्या ४७९ रूपयांच्या प्लानमध्ये युज४सला ५६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. मात्र आता युजर्सला केवळ ४८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तर युजर्सला आता या प्लानमध्ये १ जीबी डेटा दररोज मिळणार आहे. या प्लानअंतर्गत युजर्सला १०० एसएमएस दिवसाला मिळतील.

६६६ रूपयांच्या प्लानची व्हॅलिडिी
वोडाफोनकडून ६६६ रूपयांच्या प्लानची व्हॅलिडिटीही कमी करण्यात आली आहे. या प्लानची व्हॅलिडिटी कमी करून ६४ दिवस करण्यात आली आहे. आधी हा प्लान ७७ दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत होता. दरम्यान, खास बाब म्हणजे युजर्सला या प्लानचे सर्व फायदे आहे तितकेच मिळणार आहेत. यात युजर्सला १.५ जीबीपर्यंत डेटा दिला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *