महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ सप्टेंबर ।। वीज,पाणी, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांची गैरसोय आहेच. मात्र महत्त्वाचे म्हणजे पिंपरी चिंचवड सारख्या औद्योगिक नगरीतून उद्योगधंदे बाहेर पडत आहे. शेजारच्या तळेगाव,चाकण एमआयडीसीमध्ये हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीचे भवितव्य सुरक्षित करायचे असेल तर “परिवर्तन” गरजेचे आहे. हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही महिला पुढाकार घेणार असल्याचा निर्धार महिला शक्तीच्या एकजुटीने केला.
संभाजीनगर येथील ‘बर्ड व्हॅली’ येथे वैशाली अजित गव्हाणे यांच्या पुढाकारातून गुरुवारी (दि. 19) महिलांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला माजी नगरसेविका विनया तापकीर, संगीता ताम्हाणे, वैशाली उबाळे, मंदा आल्हाट, शांता आल्हाट, प्रियांका बारसे, स्वाती साने, शीतल मासुळकर, अश्विनी कांबळे, तृप्ती मोरे, मंगल खाडे, वैशाली वाळके, माया भालेकर, सपना साने, सीमा भालेकर, संगीता आहेर, स्वाती भालेकर , शुभांगी बोऱ्हाडे, शुभांगी लांडे, योगिता रणसुभे, प्रिया कोलते, संगीता जाधव, प्राजक्ता तापकीर, वैशाली तापकीर, स्मिता तापकीर, प्रतिभा तापकीर, ज्योती तापकीर, सृष्टी तापकीर, प्रणिता ताटे, कविता बुर्डे, वैशाली खेडकर आदी उपस्थित होत्या.
या मेळाव्यामध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनीही मार्गदर्शन केले.मेळाव्यामध्ये महिलांनी स्थानिक प्रश्नांपासून वाढलेल्या बेरोजगारी पर्यंतचे मुद्दे मांडले. या प्रश्नांवर तोडगा काढायचा असेल तर बदल गरजेचा आहे असे मत अनेक महिलांनी व्यक्त केले.
विनया तापकीर म्हणाल्या, घरातील तरुण पिढी शिकलेली आहे. उच्चशिक्षित आहे . चार चार डिग्री हातात असताना मुलांच्या हाताला रोजगार नाही.याला जबाबदार कोण? पाण्याची टंचाई, विजेचा लपंडाव , रस्त्यावरचे खड्डे या प्रश्नाने आम्ही त्रस्त आहोतच .मात्र आमच्या पुढच्या पिढीसमोर बेरोजगारीचा,चांगल्या शिक्षणाचा खूप मोठा प्रश्न आहे.
महिलांनी बेरोजगारीचा मुद्दा आणला ऐरणीवर
पिंपरी चिंचवड शहरातील अनेक उद्योग बाहेर पडत आहे. हिंजवडी भागांमध्ये ट्रॅफिकचा प्रश्न आहे. हेच प्रश्न चाकण तळेगाव एमआयडीसी समोर आ वासून उभे आहेत. महाराष्ट्रात येणारा प्रत्येक औद्योगिक प्रकल्प बाहेर नेला जात आहे. असेच होत राहिले तर आमच्या पुढच्या पिढीसमोर भवितव्य काय आहे असे गंभीर मुद्दे यावेळी महिलांनी मांडले.या प्रश्नांना आम्हीच उत्तर शोधणार आहोत. परिवर्तन घडवून आमच्या आणि आमच्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा मार्ग सुकर करणार असल्याचा निर्धार यावेळी महिलांनी व्यक्त केला.