महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ सप्टेंबर ।। नवरात्रोत्सव काळामध्ये साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भक्तगण वणी येथे येतात.याच पार्श्वभूमीवर सप्तश्रृंगी देवीच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलीय. नवरात्रोत्सवात गडावर भाविकांची संख्या लाखोंमध्ये असते. एकाचवेळी अनेक भाविक गडावर जमतात. त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी या नऊ दिवसांमध्ये असते.
सप्तशृंगी देवीच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवरात्रौत्सव काळात सप्तशृंगी देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे. ०३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान मंदिर भाविकांना (Saptashrungi Devi temple) दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे. नवरात्रौत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी निर्णय घेण्यात आलाय.
मंदिर २४ तास खुलं राहणार
गडावर देवीच्या (Saptashrungi Devi) मंदिरात जाणारी फनिक्युलर ट्रॉली देखील २४ तास कार्यान्वित असणार आहे. मंदिर गाभाऱ्यात फनिक्युलर ट्रॉलीने येणाऱ्या भाविकांना ३० टक्के तर पायरीने येणाऱ्या भाविकांना ७० टक्के प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला (Nashik News) गेलाय. परंतु नवरात्रौत्सव काळात नांदुरी ते सप्तशृंगी गडादरम्यान खासगी वाहतूक देखील बंद राहणार आहे. १०० एसटी बसेसच्या माध्यमातून नांदुरी ते सप्तशृंगी गड भाविकांची वाहतूक करण्याचं नियोजन आहे.
सुलभ दर्शनासाठी निर्णय
गर्दीचं नियोजन आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील वर्षी सप्तशृंगगड परिसरामध्ये भाविकांची कुठल्याही पद्धतीने गैरसोय होवू (Navratri festival) नये, या अनुषंगाने उदभोदन कक्षाची स्थापना केली गेली होती. यंदा देखील नवरात्रीच्या नऊ दिवसात मंदिर सुरू राहणार आहे. शासकीय अधिकारी, सप्तशृंग निवासिनी ट्रस्ट विश्वस्त, व्यवस्थापक ग्रामपंचायत यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय.