पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे रद्द; आजपासून सोमवारपर्यंत ब्लॉक, काही गाड्यांचे मार्ग बदलले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ सप्टेंबर ।। दौंड ते मनमाड सेक्शन दरम्यान असलेल्या राहुरी-पढेगाव स्थानकांदरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम होणार आहे. त्यामुळे २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळित होणार आहे. याचा फटका प्रवाशांना बसणार आहे.

शनिवारी (ता. २१) या गाड्या रद्द ः दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, निजामाबाद-दौंड, पुणे-हजूरसाहिब नांदेड एक्स्प्रेस, हजूरसाहिब नांदेड-पुणे एक्स्प्रेस. रविवारी (ता. २२) ः पुणे-हरंगुल एक्स्प्रेस, हरंगुल-पुणे एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेस, दौंड-निजामाबाद, जबलपूर-पुणे विशेष. सोमवारी (ता. २३) : पुणे-हरंगुल एक्स्प्रेस, हरंगुल-पुणे एक्स्प्रेस, पुणे-जबलपूर विशेष.

या गाड्यांचे मार्ग बदलले
जम्मूतावी-पुणे झेलम एक्स्प्रेस : मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-लोणावळामार्गे धावेल. पुणे-हजूरसाहिब नांदेड एक्स्प्रेस : दौंड-कुर्डुवाडी-लातूर-परळी वैजनाथ-परभणीमार्गे धावेल. हजूरसाहिब नांदेड-पुणे एक्स्प्रेस : परभणी-परळी वैजनाथ-लातूर-कुर्डुवाडी-दौंडमार्गे धावेल.

वास्को दा गामा-हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस : पुणे-लोणावळा-कर्जत-पनवेल-कल्याण-इगतपुरी आणि मनमाडमार्गे धावेल. यशवंतपूर-अहमदाबाद एक्स्प्रेस : दौंड-पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड आणि सुरतमार्गे धावेल.

हजरत निजामुद्दीन-हुबळी एक्स्प्रेस : मनमाड – इगतपुरी-कल्याण-पनवेल-लोणावळा- पुणे-दौंडमार्गे धावेल. हजरत निजामुद्दीन – वास्को द गामा गोवा एक्स्प्रेस : मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-लोणावळा-पुणेमार्गे धावेल. निजामाबाद-दौंड : परभणी-परळी वैजनाथ-लातूर-कुर्डुवाडी-दौंडमार्गे धावेल. दौंड-निजामाबाद : दौंड-कुर्डुवाडी-लातूर-परळी वैजनाथ-परभणी मार्गे धावेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *