मुंबई-पुणे, कल्याण-नगर रस्ते तीन महिन्यांत दुरुस्त करा; नितीन गडकरी यांचा राज्य सरकारला इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ सप्टेंबर ।। राज्य सरकारची जबाबदारी असलेल्या मुंबई-पुणे आणि कल्याण-नगर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ते आमचे, या रस्त्यांचे काम महाराष्ट्र सरकारकडे आणि शंभर टक्के शिव्या मी खात आहे. त्यामुळे राज्य सरकारला नोटीस द्या. तीन महिन्यांच्या आत हे रस्ते दुरुस्त नाही झाले तर करार रद्द करा व रस्ते आपल्या ताब्यात घ्या असे मी अधिकाऱ्यांना सांगितले आहे, असा इशारा केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला दिला.


पालखी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील दिवे घाट ते हडपसर रस्त्याचे चौपदरीकरण, सिंहगड रस्ता ते वारजे सेवा रस्ते आणि मुळा-मुठा नदीवरील पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाव्यवस्थापक अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *