महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ सप्टेंबर ।। Sharad Pawar on Badlapur School Case Accused Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत सोमवारी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास त्याला तळोजा जेलमधून बदलापूरच्या दिशेने ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात होते. त्यावेळी हा प्रकार घडला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसाच्या हातून बंदूक हिसकावून घेतली आणि एपीआय निलेश मोरे पोलिसांच्या व्हॅन मधून ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना शेजारील पोलिसाची बंदूक हिसकावून घेत गोळीबार केला. यात आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. या प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया ट्विट केली.
बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 23, 2024
“बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे,” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी ट्विटमध्ये व्यक्त केली.
कसा झाला एन्काऊंटर?
आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांच्या व्हॅनमधून ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात होते. त्यावेळी त्याच्यासोबत पोलीस व्हॅनमध्ये शेजारी पोलिस बसला होता. त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना अक्षयने पोलिसाची बंदूक हिसकावून घेत स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची माहिती सुरुवातीला मिळाली होती. पण त्यानंतर त्याने पोलिसांवर गोळीबार केल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली. अक्षयने पोलिसांच्या बंदुकीने गोळीबार केला. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनीही गोळीबार केला. त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या वेळी अक्षयच्या गोळीबारापासून वाचवण्यासाठी पोलीसांनीही गोळीबार केला. त्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.