महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ सप्टेंबर ।। राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात अनेक महत्वाच्या योजनांचा घोषणा केल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या महत्वाच्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राज्य सरकारने दोन हफ्ते मिळून 3000 हजार रुपये रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केली आहे. अशातच आता तिसऱ्या हप्त्याचे वितरण कधी होणार? असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला होता. याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
29 सप्टेंबरपासून होणार वाटप
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा राज्स्तरीय तिसरा कार्यक्रम हा 29 सप्टेंबर रोजी रायगडमध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जदार महिलांना आर्थिक लाभ मिळणार आहे. अर्जामध्ये त्रुटी असल्यामुळे अनेक महिलांना योजनेचा फायदा घेता आला नाही. परंतु आता त्या महिलांना सुद्धा तिसऱ्या टप्प्यात आर्थिक लाभ मिळणार आहे. एकूण 2 कोटी महिलांना लाभ दिला जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.