Pune Water Cut: ऐन पावसाळ्यात पुण्यात ‘या’ भागात गुरुवारी पाणीकपात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ सप्टेंबर ।। पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आधीच माहिती देण्यात आली आहे.

पुण्यातील केदारेश्व पपिंग स्टेशन, कात्रज येथे व्हॉव्हलचे आणि मुख्य जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा बंद असणार आहे.

गुरुवारी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर शुक्रवारी उशिरा पाणीपुरवठा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना गुरुवारी पाणी येणार नाही आणि शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

पुण्यातील या ठिकाणी राहणार पाणीपुरवठा बंद
पुण्यात बालाजी नगर, पुण्याई नगर, काशिनाथ पाटील नगर, श्री हरी सोसायटी परिसर, कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, गुजरवाडी रस्ता, वरखडेनगर, भूषण सोसायटी, राजस सोसायटी, कदम प्लाझा परिसार, सुखसागर नगर भाग १ आणि २, आगममंदिर परिसर, संतोष नगर, अंजली नगर या परिसरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

याचसोबत दत्तनगर, जांभूळ वाडी रस्ता, आंबेगाव रस्ता, वंडर सिटी परिसर,मोरे बाग परिसर, चंद्रभागा नगर, भारती विद्यापीठ मागील परिसर, कात्रज कोंढवा रस्ता संपूर्ण परिसर, शिवशंभो नगर, गोकुळनगर. साईनगर, गजानन नगर, काकडे वस्ती, अशरफनगर, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर व सुपर इंदिरानगरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकरनगर, कोंढवा बुद्रूक गाव, लक्ष्मीनगर, सोमजी बस स्टॉप परिसर, पुण्यधाम आश्रम रस्ता, साई सर्व्हिस, पारगे नगर, खडी मशीन परिसर, बधेनगर, येवलेवाडी, कामठे – पाटील नगर परिसरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना आधीच पाणी भरुन ठेवण्यास सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *