महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ सप्टेंबर ।। गेल्या अनेक दिवसांपासून सोने-चांदीचे भाव वाढताना दिसत आहे. आज जळगावात सोन्याचे भाव ७५,५०० रुपये झाले आहे. सोन्याच्या भावात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. दररोज सोन्याच्या भावात वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सोने खरेदी करण्याचा विचारदेखील करु शकत नाही.
सोन्याचे भाव ७५ हजारांच्या पार गेले आहेत. यावर जीएसटी लागून ७७ हजार ८०० रुपये तुम्हाला १ तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार आहे. चांदीतही गेल्या अनेक दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी चांदीच्या किंमतीत ३०० रुपयांनी वाढ झाली होती. त्यामुळे चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
गुडरिटर्न्सच्या वेबसाइटनुसार देशभरात २४ कॅरेट सोने ७६,३७० रुपये प्रति तोळा विकले जात आहे. तर २२ कॅरेट सोने ७०,०१० रुपये प्रति तोळ्यावर विकले जात आहे.१८ कॅरेट सोन्याची किंमत ५७,२८० रुपये प्रति तोळा आहे.
महाराष्ट्रातील सोने चांदीचे भाव
मुंबई
२२ कॅरेट सोने- ७९,०१०
२४ कॅरेट सोने-७६,३७०
१८ कॅरेट सोने-५७,२८० रुपये प्रति तोळा
नागपूर
२२ कॅरेट सोने- ७९,०१०
२४ कॅरेट सोने-७६,३७०
१८ कॅरेट सोने-५७,२८० रुपये प्रति तोळा
पुणे
२२ कॅरेट सोने- ७९,०१०
२४ कॅरेट सोने-७६,३७०
१८ कॅरेट सोने-५७,२८० रुपये प्रति तोळा
चांदीची किंमत
आज देशभरात १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,२८० रुपये आहे. तर १००० ग्रॅम चांदीची किंमत ९२,८०० रुपये आहे. पुण्यात चांदीची किंमत ९,२८० रुपये आहे तर १०० ग्रॅम चांदी ९२,८०० रुपये आहे. दिल्लीत चांदीची किंमत ९२९ रुपये आहे तर १०० ग्रॅम चांदी ९२,९०० रुपयांवर विकली जात आहे.