नांदेड : बारा दिवसानंतर शहरात तुफान गर्दी, बाजरापेठ ग्राहकांनी गजबजली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – नांदेड – ता. २५ जुलै – कोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुकालेल्या संचारबंदीनंतर जिल्ह्यातील कारभार शुक्रवारी (ता. २४) सुरळीत झाला. घराच्या बाहेर न पडलेल्या नागरिकांनी विविध दुकानावर एकच गर्दी केली. तब्बल बारा दिवसांच्या संचारबंदीनंतर आस्थापने सुरू झाली. बाजारात लोकांची चांगलीच गर्दी उडाल्याचे बघायला मिळाले. शहर व जिल्ह्यातील कोरोनाची साथ आटोक्यात आली नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी करणे हे कितपत उचीत आहे हा सर्वसामान्य व जिल्हा प्रशासनालाही पडलेला प्रश्न आहे .

जिल्ह्यात कोरोनाने हैदोश घातला असून रुग्णसंख्या ही एक हजाराहून अधिक झाली आहे. त्यातील जवळपास साठ रुग्णांचा बळी गेला आहे. अजूनही साडेचारशेहून अदिक रुग्ण कोरानाशी दोन हात करत आहेत. या आजाराचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून शारिरीक अंतर व गर्दी टळावी यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. विपिन यांनी ता. १२ जूलै ते ता. २३ जुलैपर्यंत संचारबंदी लावली होती. या काळातही अत्यावश्यक सेवा पुर्णपणे सुरळीत सुरु ठेवण्यात आल्या होत्या. मात्र संचारबंदी उठवताच नांदेडकरांनी एकच गर्दी केली. अशा गर्दीमुळे पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शुक्रवारी बाजारपेठ सुरू झाली आहे. बाजारात कोणत्या ना कोणत्या कारणानिमित गर्दी होत असल्याचे बघायला मिळाले. अनेक भागात वाहनांची रहदारी वाढल्याचे बघायला मिळाले. शहराच्या वजिराबाद, श्रीनगर, तरोडा नाका, जुना मोंढा, बर्की चौक, सराफा, कापड मार्केट, भुसार मार्केट, फळभाजी विक्रेत्यांच्या दुकानावर नांदेडकरांनी तुफआन गर्दी केली. या गर्दीत नागरिकांनी कुठेच शारिरीक अंतर पाळल्या जात नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. नागरिकांनी गर्दी न करता सुरक्षित आंतर पाळून कोरोनाचा संसर्ग टाळण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


नियमाचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन

कोरोनाला हरवायचे असेल तर नागिरकांनी आपले कर्तव्य समजून बाजारपेठेत फिरत असतांना शारिरीक अंतर पाळणे महत्वाचे आहे. जगात व देशात तसेच राज्यात या कोरोनाचा कहर वाढत आहे. आपल्या जिल्ह्यातही रुग्ण संख्या ही एक हजाराहून अधिक झाली आहे. त्यामुळे आपणास अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने घालु दिलेल्या नियमाचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *