महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ सप्टेंबर ।। महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. दर वर्षी १८००० रुपये मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत २.४ कोटी महिलांनी अर्ज केले आहेत, असं महिला व बालकल्याण विभागाने सांगितले आहे. या योजनेत जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा यासाठी ही मुदतवाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.ही मुदतवाढ ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाढवली जाऊ शकते.
लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची तारीख सप्टेंबर अखेरपर्यंत होती. यामध्ये आतापर्यंत २.५ कोटी अर्ज आले आहेत. त्यापैकी २.४ कोटी अर्ज मंजूर झाले आहेत. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काही उपक्रम राबवण्यात आले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत २.५ कोटी महिला या योजनेचा लाभ घेतील, अशी आशा सरकारला आहे. मागील दहा दिवस राबवण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे अर्ज वाढत असल्याचे दिसत आहे, असं सांगण्यात आले आहे.
ज्या उमेदवारांच्या अर्जात काही समस्या असेल. बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
पुण्यात आतापर्यंत सर्वाधिक अर्ज करण्यात आले आहे. पुण्यात १८ लाख महिलांनी अर्ज केले आहेत. तर त्यानंतर नाशिकमध्ये १४ लाख महिला, ठाण्यात १२ लाख तर नागपूरमध्ये १० लाख महिलांनी या योजनेअंतर्गत अर्ज केले आहेत. (Ladki Bahin Yojana)
लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसरा हप्ता २९ सप्टेंबर रोजी येणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्रितपणे आले होते. त्यानंतर आता हा हप्ता लवकरच महिलांना मिळणार आहे. या योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ होणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.