BIS Recruitment: सरकारी नोकरी ; पहा कुठे निघाली भरती? जाणून घ्या पात्रता आणि अटी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ सप्टेंबर ।। ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजे भारतीय मानक विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या देशभरातली ऑफिसमध्ये ही भरती होणार आहे. ग्रुप सी/बी आणि ए पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

भारतीय मानक विभागात सिनियर सेक्रेटरिएट असिस्टंट पदासाठी १२८ जागा रिक्त आहेत. यामध्ये ग्रुप सीमधील पदांसाठी दर महिन्याला २५,५०० ते ८१,००० रुपये पगार मिळणार आहे. या पदासाठी वयोमर्यादा २७ वर्ष आहे. (BIS Jobs)

सिनियर सेक्रिटरिएट असिस्टंटसाठी १२८ पदे रिक्त आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांकडे पदवी असणे गरजेचे आहे. उमेदवारांना कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट द्याव्या लागतील. यामध्ये वर्ड प्रोसेसिंग टेस्ट, मायक्रोसॉफ्ट एक्सेलवर स्प्रेड शीट टेस्ट आणि मायक्रोसॉफ्य पॉवर पॉइंट टेस्ट घेण्यात येणार आहे.

स्टेनोग्राफरसाठी १९ पदे रिक्त आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांकडे पदवी असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना टायपिंग, शॉर्ट हँड टेस्ट द्यावी लागणार आहे. सिनियर टेक्निशियनमध्ये कारपेंटरसाठी ७ पदे रिक्त आहेत. वेल्डरसाठी १ पदे आहे. प्लंबरसाठी २ पदे रिक्त आहेत.फिटर पदासाठी ५ पदे रिक्त आहेत. या पदासाठी १०वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.तसेच ज्युनिअर सेक्रेटरिएट असिस्टंट पदासाठी ७८ जागा रिक्त आहेत.यासाठी पदवीप्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. (Breau Of Indian Standard Recruitment)

ग्रुप बीमधील पदांसाठी ३५,४०० ते १,१२,४०० रुपये वेतन मिळणार आहे. यामध्ये पर्सोनल असिस्टंटसाठी ४३ पदे रिक्त आहेत. असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी ४३ पदे रिक्त आहेत.असिस्टंटसाठी १ पद रिक्त आहे. टेक्निकल असिस्टंट लॅबोरेटरीसाठी २७ पदे रिक्त आहेत. (Government Job)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *