Sharad Mohol Case: शरद मोहोळ हत्या प्रकरण: मुख्य आरोपी विठ्ठल शेलार व रामदास मारणे न्यायालयीन कोठडीत; मुख्य सुत्रधार अद्याप फरार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जानेवारी ।। शरद मोहोळ हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी विठ्ठल शेलार व रामदास मारणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर या गुन्ह्याचा सूत्रधार गणेश मारणे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील (Pune) कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणात काही दिवसांपुर्वीच विठ्ठल शेलार व रामदास मारणे यांना अटक करण्यात आली होती. या दोघांची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने काल त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. ज्यानंतर विठ्ठल शेलार व रामदास मारणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

या प्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. फरार गणेश मारणे आणि अटकेतील आरोपी यांच्याकडे एकत्रित तपास करण्याकरिता त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र ही मागणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी फेटाळली.

दरम्यान, शरद मोहोळ (Sharad Mohol) खून प्रकरणात विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे मुख्य सूत्रधार आहेत. शेलार आणि मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी एक महिना आधी बैठक घेतली असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. सध्या पोलीस गणेश मारणेचा शोध घेत आहेत. आरोपी गणेश मारणे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *