WTC Points Table: दुसरा सामना रद्द झाल्यास टीम इंडियाचं टेन्शन वाढणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ सप्टेंबर ।। कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे धुतला गेला. तर दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर याचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेवर काय परिणाम होणार? जाणून घ्या.

भारतीय संघ अव्वल स्थानी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आतापर्यंत भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय संघ या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. भारतीय संघ ७१. ६७ टक्के गुणांसह अव्वल स्थानी आहे. गेल्या काही मालिकांपासून भारतीय संघाने अव्वल स्थानी कब्जा केला आहे. तर बांगलादेशचा संघ ३९.२९ टक्के गुणांसह सहाव्या स्थानी आहे. जर कानपूर कसोटी सामना ड्रॉ झाला, तर याचा बांगलादेशपेक्षा भारतीय संघाला मोठा धक्का बसणार आहे.

कोणाला किती गुण मिळतात?
आधी विजेत्या संघाला किती गुण मिळतात? हे समजून घ्या. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये कसोटी सामना जिंकणाऱ्या संघाला १२ गुण मिळतात. तर सामना ड्रॉ झा झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी ४-४ गुण मिळतात.

त्यामुळे हा सामना जर भारताने जिंकला, तर ७४.२४ गुणांसह भारतीय गुणांसह भारतीय संघाची गुणतालिकेतील स्थिती आणखी मजबूत होईल. मात्र सामना ड्रॉ किंवा रद्द झाल्यास भारतीय संघाची विजयाची सरासरी ही ६८.१८ टक्के इतकीच राहिल. त्यामुळे हा सामना रद्द झाल्यास बांगलादेशचा फायदा होईल. तर भारतीय संघाचं टेन्शन वाढणार आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम गोलंदाजी करताना भारताने सुरुवातीलाच बांगलादेशला २ मोठे धक्के दिले. जाकीर हसन शून्यावर तर शदमन इस्लाम २४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर कर्णधार शांतोने ३१ धावांची खेळी केली. दरम्यान मुशफिकुर रहिम ६ तर मोमिनूल हक ४० धावांवर नाबाद आहे. बांगलादेशने ३ गडी बाद १०७ धावा केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *