महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ सप्टेंबर ।। Gold Silver Today’s Rate : सप्टेंबर महिन्यात सोने चांदीच्या दरात अनेकदा चढ उतार दिसून आले. काही वेळा सोने चांदीचे दर घसरले तर काही वेळा सोने चांदीच्या दराने विक्रमी पातळ गाठली. सध्या सोने चांदीच्या दरात किरकोळ घसरण होत असून महिन्याच्या सुरुवातीच्या तुलनेत आता सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. आज सुद्धा सोन्याचे दर ४२० रूपयांनी वाढले असून चांदीचे दर स्थिर आहे. सोने चांदीचे दर सविस्तर जाणून घेऊ या.
सोने चांदीचे दर
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६९,४३८ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७५,७५० रुपये आहे. कालच्या आकडेवारीच्या तुलनेत आजचा चांदीचा दर स्थिर आहे . १० ग्रॅम चांदीची किंमत ९१४ रुपये आहे म्हणजेच चांदी ९१,४३० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,३०९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७५,६१० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,०२५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७५,६१० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,०२५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७५,६१० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,०२५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७५,६१० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)