महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० सप्टेंबर ।। इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिका खेळवली जात आहे. या दोनी संघामध्ये 5 सामन्यांची वनडे मालिका खेळवली गेली. इंग्लंडने सामन्याच्या सुरुवातीपसूनच ऑस्ट्रेलियाला नतमस्तक ठेवण्यात यश मिळवले होते. इंग्लंडचे पारडे जड असताना ऑस्ट्रेलिया संघ कसा जिंकला जाणून घ्या.
बेन डकेटचे शतक आणि कर्णधार हॅरी ब्रूकच्या झंझावाती 72 धावांनंतर, खराब हवामानाने कांगारूंना वाचवले असताना इंग्लंडने धारदार गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाला जवळजवळ गुडघे टेकले होते. सततच्या पावसामुळे पाचवा आणि निर्णायक एकदिवसीय सामना मध्यभागी थांबवावा लागला, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने डकवर्थ-लुईस पद्धतीचा वापर करून सामना 49 धावांनी जिंकला आणि मालिका 3-2 ने जिंकली.
He enjoyed that one! 😁
Live clips: https://t.co/antn58zQG4
🏴 #ENGvAUS 🇦🇺 @IGcom pic.twitter.com/f4bldYgJSJ
— England Cricket (@englandcricket) September 29, 2024
ऑस्ट्रेलियाने मालिका 3-2 ने जिंकली
याआधी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाने मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले होते, परंतु इंग्लंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलग 14 विजयांना ब्रेक लावला आणि त्यानंतर चौथी वनडे 186 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकली. शेवटच्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 310 धावांचे लक्ष्य दिले.
डकेट आणि ब्रूकची खेळी व्यर्थ
इंग्लंडकडून बेन डकेटने 91 चेंडूत 107 धावांच्या खेळीत 13 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्याने पहिल्या विकेटसाठी फिल सॉल्ट (27 चेंडूत 45 धावा) सोबत 42 चेंडूत 58 धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर हॅरी ब्रूक्ससोबत तिसऱ्या विकेटसाठी 98 चेंडूत 132 धावांची भागीदारी केली. ब्रूकने 52 चेंडूंत सात षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 72 धावा केल्या. कामचलाऊ फिरकी गोलंदाज ट्रॅव्हिस हेडने डकेटसह चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हेडने 6.2 षटकांत 28 धावांत चार बळी घेतले. झाम्पा, ग्लेन मॅक्सवेल आणि ॲरॉन हार्डी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. झाम्पाने 10 षटकांत 74 धावा दिल्या, त्याविरुद्ध ब्रूकने पाच षटकार मारले.
पावसाने सगळी मजाच उध्वस्त केली
310 धावांच्या लक्ष्याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. संघाची धावसंख्या सात षटकांत 78 धावा होती, पण आठव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ब्रॅडन कारसेने ट्रॅव्हिस हेडला 31 बाद करून ही भागीदारी मोडीत काढली. 13व्या षटकात तुफानी फलंदाजी करणारा दुसरा सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट 30 चेंडूत 58 धावा काढून बाद झाला. 118 धावांवर दुसऱ्या विकेटनंतर स्टीव्ह स्मिथ (36) आणि जोश इंग्लिस (28) यांच्यात चांगली भागीदारी झाली. 20.4 षटकात 165/2 अशी धावसंख्या होती. 180 चेंडूत 145 धावा करायच्या होत्या. सामना अडकू शकला असता, पण त्यानंतर पावसाने सगळी मजाच उधळली.