Income Tax: देशातील करदात्यांना मोठा दिलासा; आवश्यक कर भरण्याची Deadline वाढवली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० सप्टेंबर ।। आयकर भरणाऱ्या करदात्यांना प्राप्तिकर विभागाने मोठा दिलासा दिला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस अर्थात CBDT ने गेल्या वर्षी म्हणजे २०२३-२४ साठी स्वतंत्र ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. आज, ३० सप्टेंबर प्राप्तिकर लेखापरीक्षण अहवाल दाखल करण्याची शेवटची तारीख आहे पण काही करदात्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन आयकर विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.

आयकर लेखापरीक्षणाची तारीख वाढली
आयकर लेखापरीक्षण अहवाल दाखल करण्याची अंतिम तारीख सात दिवसांनी पुढे ढकलली आहे. म्हणजे आता करदाते ७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑडिट रिपोर्ट सादर करू शकतील. मुदतवाढ वाढवण्याचे कारण म्हणजे करदात्यांना लेखापरीक्षण अहवाल दाखल करताना विशेषत: इलेक्ट्रॉनिक फाइलिंगमध्ये येणाऱ्या अडचणींना समोरे जावे लागते ज्यामुळे प्राप्तिकर विभागाने निर्णय घेतला आहे. आज, शेवटच्या तारखेपूर्वीच सीबीडीटीने निर्णय घेऊन मोठ्या संख्येने ऑडिट अहवाल सादर केलेल्या करदात्यांची सोय केली आहे.

आयकर विभागाचा मोठा दिलासा
ऑडिट करणाऱ्या अनेक करदात्यांना प्रथम ऑडिट रिपोर्ट दाखल करावा लागतो आणि नंतर ऑडिट रिपोर्टसह टॅक्स जमा करावा लागतो. करदात्यांची मुदत चुकली किंवा लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात अपयशी ठरल्यास त्यांना १.५ लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे करदात्यांना ऑडिटचे काम करण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे जेणेकरून वेळेवर ऑडिट रिपोर्ट दाखल करू शकतील.

कोणत्या करदात्यांना लाभ होणार
प्राप्तिकर विभागाच्या या निर्णयाचा फायदा त्या सर्व लोकांना होईल ज्यांना इन्कम टॅक्स ऑडिट करणे आवश्यक आहे. यामध्ये वैयक्तिक करदाते, कंपन्या आणि त्या सर्व करदात्यांचा समावेश आहे ज्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत आयटीआर सबमिट करायचा आहे.

इन्कम टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा कसा करायचा?
तुम्ही तुमचा टॅक्स ऑडिट रिपोर्ट किंवा लेखापरीक्षण आयकर ई-फायलिंग पोर्टलवर ऑनलाइन सबमिट करू शकता. लक्षात घ्या की हे फक्त अशा लोकांसाठी आहे ज्यांना कर ऑडिट करणे आवश्यक आहे. तुम्हाला टॅक्स ऑडिटची आवश्यकता नसल्यास तुम्हाला हा अहवाल सबमिट करण्याची आवश्यकता नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *