CJI Chandrachud : “Yeah म्हणायला हे कॉफी शॉप नाही” Yes’ (येस) म्हणा., सरन्यायाधीश चंद्रचुडांनी वकिलाला झापलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० सप्टेंबर ।। .भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी (३० सप्टेंबर) न्यायालयात एका प्रकरणाची सुनाणी चालू असताना वकिलांना शिष्टाचाराचा धडा दिला. हे वकील माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात अंतर्गत चौकशी करण्याची मागणी करत होते. हे वकील न्यायालयात त्यांच्या याचिकेबद्दल बोलत होते. त्यानंतर सरन्यायाधीश त्यावर टिप्पणी करत असताना हे वकील सतत मान डोलावून Yeah, Yeah, Yeah (याह) म्हणत होते. त्यावर सरन्यायाधीश त्या वकिलास म्हणाले, Yeah, Yeah, Yeah म्हणण्यापेक्षा ‘Yes, Yes, Yes’ (येस) म्हणा. सरन्यायाधीशांनी ऐकवल्यानंतर त्यांनी माफी मागितली व त्यांचा मुद्दा मांडण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा एकदा हे वकील बोलताना अडखळले. तसेच त्यांनी पुन्हा एकदा Yeah चा उच्चार केला. त्यावर सरन्यायाधीशांनी त्यांना पुन्हा एकदा Yeah ऐवजी Yes म्हणण्यास सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *