Resign : क्रिकेट विश्वात खळबळ ; एक तासाच्या आत दोन कर्णधारांचे तडकाफडकी राजीनामे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ ऑक्टोबर ।। भारत आणि बांगलादेश मालिका आता पार पडली असून आता येत्या १६ ऑक्टोबरपासून न्यूझीलंडसोबतची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेआआधी क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय संघांच्या दोन कर्णधारांनी राजीनामे दिले आहेत. यामधील एक कर्णधार हा न्यूझीलंड संघाचा आहे. त्यामुळे येत्या भारत आणि न्यूझीलंडमधील मालिकेमध्ये किवींचा नवीन कर्णधार असणार आहे. कोण आहेत दोन कर्णधार ज्यांनी एक तासाच्या आसपास आपले राजीनामे दिले आहेत.

कोण आहेत ते दोन कर्णधार?

न्यूझीलंड संघाच्या कर्णधारपदाचा टीम साऊदी याने राजीनामा दिला आहे. तर दुसरा पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझम याने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कर्णधारांनी वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करत आणखीच दमदार प्रदर्शन करणार असल्याचं सांगितलं आहे. न्यूझीलंड संघाने सलग दोन मालिका गमावल्या आहेत. न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर २-० ने तर श्रीलंकेने त्यांच्या घरच्या मैदानावर २-० ने पराभव केला. या दोन मालिका गेल्यानंतर साऊदी याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. 35 वर्षीय टीम साऊदी याने न्यूझीलंडकडून 2008 मध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत 102 कसोटी सामन्यांमध्ये 382 बळी घेणारा साऊदी संघातील सीनिअर खेळाडू आहे. न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद आता टॉम लेथ लॅथम याच्याकडे आता कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीये.

पाकिस्तान संघाचा स्टार खेळाडू बाबर आझम याने पुन्हा एकदा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझम याच्याकडे वनडे आणि टी-२० क्रिकेट फॉरमॅटचे कर्णधारपद सोपवले होते. विशेष म्हणजे आझमला दुसऱ्यांदा कर्णधारपद दिले होते. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान बाहेर पडल्यामुळे त्याला कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र संघाची कामगिरी आणखीनच खालावल्याने बोर्डाने त्याच्याकडा व्हाईट बॉल म्हणजेच वन डे आणि टी-२० क्रिकेटचे कर्णधारपद दिले होते. मात्र बाबरने आता दोन्हीही कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *