महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑक्टोबर ।। देहूगाव (प्रतिनिधी) ।। भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच पुरस्कृत श्री.सचिन परशुराम काळोखे आणि चिंतामण उर्फ तात्या पंचपीड यांच्या वतीने , श्री क्षेत्र देहूगाव येथे आकर्षक बैल जोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
देहू मजरे माळवाडी विविध कार्यकारी सोसायटी यांच्या वतीने प्रत्येक सहभागी बैलजोडीस चारा ,धान्य वाटप व बैलजोडी मालक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
मावळ तालुक्यात खिल्लार बैलाची बैलगाडा शर्यतीसाठी आणि शेतीच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात पैदास केली जाते. कृषी संस्कृती मधील महत्वाचा घटक असलेल्या बैलांना शेतकरी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे जपत , त्यांचे संगोपन करतात. मावळ तालुक्यात बैलपोळा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मोठ्या संख्येने युवक बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढून , आनंद साजरा करतात. याच , परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी रविंद्र आप्पा भेगडे युवा मंचच्या वतीने , या स्पर्धेचे छत्रपती शिव मंदिर चौक , देहूगाव येथे आयोजन करण्यात आले होते.
यामधील प्रथम पारितोषिक श्री.अमोल नामदेव काळोखे रु.५००० /- , द्वितीय पारितोषिक श्री.गोविंद बाळू हगवणे ३,०००/- आणि तृतीय पारितोषिक श्री.धोंडिबा चव्हाण २,०००/- यांच्या बैलजोडीस प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी , देहू मजरे माळवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल रामभाऊ काळोखे , व्हाईस चेअरमन बाळासाहेब दामू हगवणे , माजी चेअरमन बेबीताई दत्तात्रय हगवणे , माजी चेअरमन सतीश विष्णू काळोखे , संचालक रवींद्र रामदास काळोखे , संचालक सागर दत्तात्रय हगवणे , संचालक राजेंद्र मोरे यांच्या सह देहूगाव ग्रामस्थ बंधू-भगिनी , बैलगाडा प्रेमी नागरिक , युवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते.