Sunil Tingre : पवारांच्या सभेनंतर महायुतीला घाम, वडगाव शेरीतून टिंगरेंना हटवणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑक्टोबर ।। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सभा घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे यांना फैलावर घेतल्यानंतर महायुतीत मोठा बॉम्ब फुटताना दिसत आहे. शरद पवारांच्या भूमिकेनंतर महायुतीतील नेत्यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. टिंगरेंना हटवून ही जागा भाजपला सोडण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे यांचं नाव उपमुख्यमंत्री अजित पवार गोत्यात आले होते. त्यातच गेल्या आठवड्यात ‘सुनील टिंगरे यांचा आता जनता बंदोबस्त करेल’ असं शरद पवारांनी म्हटल्यानंतर महायुतीत वेगवान हालचाली होताना दिसत आहेत.

सुनील टिंगरे यांच्याबाबत भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यात बैठक झाली. यावेळी वडगाव शेरीची जागा बदलण्यावरून चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीऐवजी भाजपकडे ही जागा दिली जाण्याचे संकेत मिळत आहेत.

वडगाव शेरीत नव्याने सर्वेक्षण
वडगाव शेरी विधानसभेबाबत पुन्हा एकदा मतदारसंघात नव्याने सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. जगदीश मुळीक यांची तयारी अचानक वाढल्यामुळे वडगाव शेरीत नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामुळे टिंगरेंना बसवून मुळीक यांना तिकीट मिळण्याची चिन्हं आहेत.

शरद पवार काय म्हणाले होते?
पुण्यातील खराडी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या निर्धार मेळाव्यात शरद पवार म्हणाले होते, की येताना बोर्ड पाहिला आमचे आमदार दमदार… मी चौकशी केली हा आमदार दमदार काय भानगड आहे? नाव काय त्याचं तर टिंगरे… अरे बाबा तू कोणाच्या तिकिटावर निवडून आलास? त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता? राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? हे समस्त हिंदुस्थानाला माहित आहे. त्या पक्षाचा वतीने तुला संधी दिली. तू काम करशील अशी अपेक्षा केली. तू सोडून गेलास ते ठीक, पण तुझा काय बंदोबस्त करायचा आहे ते नागरिक करतील. त्याची बिलकुल चिंता नाही. पण निदान चुकीच्या गोष्टींना पाठिंबा तरी देत जाऊ नकोस, असं म्हणत शरद पवार यांनी सुनील टिंगरे यांच्यावर निशाणा साधला होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *