महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑक्टोबर ।। पुणे हा चार तासांचा प्रवास केवळ २० मिनिटांत पूर्ण करता येईल हे सांगितलं तर कोणाला विश्वास बसणार नाही, मात्र विमानाहून सुपरफास्ट असलेली ट्रेन भारतात आल्यास हे शक्य होऊ शकतं. या सुपरफास्ट ट्रेनमुळे मुंबई – गोवा प्रवास केवळ एका तासात पूर्ण करता येऊ शकतो, तर मुंबई-नागपूर प्रवास जवळपास सव्वा तासात पूर्ण होईल.
मुंबई – पुणे प्रवास आता सुस्साट… चार तासांचं अंतर दीड तासात; कसा, कुठून असेल नवा मार्ग? कधी सुरू होणार?
मुंबई – गोवा प्रवासासाठी सध्या वंदे भारत ट्रेनने जवळपास साडेपाच तास लागतात. हा प्रवास सुपरफास्ट ट्रेन भारतात आली, तर केवळ एक तासात पूर्ण होईल. तसंच मुंबई – पुणे हा चार तासांचा प्रवास २० मिनिटांत आणि मुंबई – नागपूर प्रवास १ तास १० मिनिटांत पूर्ण करता येऊ शकतो. चीनमध्ये या सुपरफास्ट ट्रेनची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. कोणती आहे ही सुपरफास्ट ट्रेन?
पुणे ते नागपूर धावणार वंदे भारत ट्रेन, या दिवशी सुरू होणार सुविधा; जाणून घ्या वेळ
चीनमध्ये ६०० किमी ताशी वेगाने धावणाऱ्या ट्रेनची यशस्वी चाचणी
भारतात सध्या वंदे भारत ट्रेन सर्वाधिक वेगवान ट्रेन आहे. ही ट्रेन १८० किमी ताशी वेगाने धावते, मात्र आता या ट्रेनचा वेग कमी करुन वंदे भारत १५० किमी ताशी वेगाने चालवली जात आहे. भारतात हा ट्रेनचा सर्वाधिक वेग आहे, तर तिथे चीनने ६०० किमी ताशी वेगाने धावणाऱ्या ट्रेनची यशस्वी चाचणी केली आहे. ही ट्रेन आहे मॅग्लेव ट्रेन आहे.