देशात पेट्रोल, डिझेल, सीएनजीला पर्याय ठरणार ‘HCNG’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – ता. २७ जुलै – सध्या ऑटोमोबाईल कंपन्या आणि सरकार वाढणारे प्रदुषण पाहता अनेक रणनीतीवर काम करत आहे. अशातच हायड्रोजन सीएनजीचा इंधनाला पर्याय म्हणून विचार पुढे येऊ लागला आहे. सरकारने यासाठी इंधनाच्या रुपात HCNG चा वापर करण्यासाठी सूचना मागवल्या आहेत. सीएनजी हे इंधनाच्या वापरात सर्वात व्यवहार्य मानले जाते, विशेषत: देशातील अनेक शहरांमध्ये योजना आखली गेली आहे.

केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीला पर्याय म्हणून हायड्रोजन सीएनजीच्या वापराबाबत गंभीरपणे विचार करत असून रस्ते आणि वाहतूक विभागाकडून याबाबत एक आराखडा बनवण्यात आला आहे. ज्यात हायड्रोजन सीएनजीचा ऑटोमोबाईल इंधनाच्या स्वरुपात समावेश करण्याबाबत सूचना मागवण्यात आल्या आहेत. केंद्रीय मोटार वाहन कायदा १९७९ यात यासाठी सुधारणा करण्यात येणार आहे.

जाणून घ्या HCNG बद्दल ? कंप्रेस्ड नैसर्गिक वायूमध्ये हायड्रोजनचे मिश्रण आहे एचसीएनजी. कंपोजिशन फिगरबद्दल बोलल्यास, १८ टक्के हायड्रोजनचे या इंधनात मिश्रण असते. हे इंजिन ऑप्टिमायझेशननंतर, हेवी ड्यूटी सीएनजी वाहनात सहज वापरले जाऊ शकते. दरम्यान सुरुवातीच्या चाचण्यांमधून असे दिसून आले आहे की, कार्बन मोनोऑक्साइड (सीओ), मिथेन आणि एकूण हायड्रोकार्बन (टीएचसी) उत्सर्जन एचसीएनजीचा वापर कमी करू शकते. सीएनजीपेक्षा इंधन वापराच्या बाबतीत ते चांगले आहे.

एचसीएनजीचा (HCNG)आणखी एक फायदा म्हणजे ते सहजपणे सीएनजी पाइपलाइन आणि बस डेपोमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. दिल्लीत एचसीएनजीच्या किटसह रेट्रोफिटेड ५० बसमध्ये प्रारंभिक पायलट चाचणी होणार आहे. दिल्लीची या पायलट प्रोजेक्टसाठी निवड यासाठी केली कारण, याठिकाणी सीएनजी बस, पंप आणि सीएनजी इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे जाळे आहे. मंत्रालयाने एचसीएनजीसाठी मसुदा जनतेच्या सूचनांसाठी खुला केला आहे. नोटीस बजावल्यानंतर ३० दिवसांच्या आत ईमेल किंवा पोस्टमार्गे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सहसचिवांकडे (एमव्हीएल) टिप्पण्या आणि मते पाठविली जाऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *