महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – ता. २७ जुलै – सध्याची लॉकडाऊनजन्य परिस्थिती तसेच कोव्हीड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाईन स्पर्धा विविध संस्था आयोजित करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘डिजीटल क्रांतीची ज्वलंत मशाल’ हे ब्रिद घेऊन महाराष्ट्रभरातून ऑनलाईन डिजीटल स्वरुपात प्रकाशित होणार्या ‘लाईव्ह महाराष्ट्र २४’ने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी श्रावण मासाचे औचित्य साधून ऑनलाईन डिजीटल राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केेले आहे. ही स्पर्धा १ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट दरम्यान असणार आहे. स्पर्धकांनी आपले चित्र २९ ऑगस्टपर्यंत आयोजकांनी दिलेल्या लिंकद्वारे गुगल फॉर्म भरून पाठवायचे आहे. या स्पर्धेत पहिली ते चौथी, पाचवी ते आठवी अशा दोन गटात होणार्या या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
लहानग्यांच्या प्रतिभेला मिळणार चालना…
लहानग्यांना त्यांचे भावविश्व व्यक्त करण्याची संधी देणे आणि मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत चित्रकलेची जोपासना करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘लाईव्ह महाराष्ट्र २४’च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही ऑनलाईन डिजीटल चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेेचे विषय १) श्रावण आणि श्रावणातील सौंदर्य
२) फुल आणि फुलपाखरू असे आहेत. 

बक्षिसाचे स्वरुप…
सदर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले असून, प्रथम, द्वितीय, तृतीय अश स्वरुपात पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक ३ हजार १ रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, द्वितीय पारितोषिक २ हजार १ रुपये सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, तर तृतीय पारितोषिक १ हजार १ रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे बक्षिसाचे स्वरुप असणार आहे. 

स्पर्धकांनी खालील लिंक वरून फॉर्म भरून स्पर्धेत आपला सहभाग नोंव्विण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
