Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
या प्रश्नावर शरद पवार म्हणाले ... माझी झोप उडाली, मी भयंकर अस्वस्थ झालो - Maharashtra 24

या प्रश्नावर शरद पवार म्हणाले … माझी झोप उडाली, मी भयंकर अस्वस्थ झालो

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑक्टोबर ।। महाविकास आघाडी आणि महायुती यांना पर्याय देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी एकत्र येऊन परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उघडली आहे. या तिसऱ्या आघाडीचा काही परिणाम होईल का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारला होता. यावर शरद पवार यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. या तिसऱ्या आघाडीचा नक्कीच परिणाम होईल. माझी तर झोप गेलीय आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत अशा शब्दात शरद पवारांनी टोलेबाजी केली.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?
राज्यात तिसरी आघाडी झाली आहे. ही तिसरी आघाडी संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी एकत्र येत तयार केली आहे. याचा काही परिणाम होईल का? असा सवाल प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांनी विचारला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, हे लोक एकत्र येतात म्हणजे याचा परिणाम होणारच. संभाजीराजे यांच्यासारखे महान घराण्यातील लोक आहेत, यामुळं नक्कीच परिणाम होईल असे शरद पवार म्हणाले. तिसऱ्या आघाडीमुळं आमची झोप गेली आहे. आम्ही सगळे भयंकर अस्वस्थ आहोत, आता आमचं काय होणार? असा टोला देखील शरद पवारांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *